ऑनलाइन लोकमत -
काबूल, दि. ११ - सरकारी कर्मचा-यांना घेऊन जाणा-या बसमध्ये करण्यात आलेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. शिक्षण मंत्रालयातील कर्मचा-यांच्या बसमध्ये आईडी स्फोट घडवून हा हल्ला करण्यात आला. बगरामी परिसरात हा हल्ला करण्यात आला.
शिक्षण मंत्रालयाच्या कर्मचा-यांना घेऊन जाणा-या बसमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. बरगमा परिसरात बस पोहोचताच स्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याच दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.