नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून अंमलात येत असलेल्या नव्या धोरणामुळे खासगीपणावर गदा येणार असल्याच्या भीतीने अनेक वापरकर्त्यांनी व्हॉट्सॲपला पर्याय शोधण्यास सुरुवात केली असतानाच व्हॉट्सॲपने आपल्या नव्या धोरणात खासगीपणा जपण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे. वापरकर्त्यांच्या मनातील अनेक किंतु-परंतुंना व्हॉट्सॲपने उत्तरे दिली आहेत.
८ फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲपचे नवीन धोरण अंमलात येत आहे. नव्या धोरणानुसार व्हॉट्सॲपकडे असलेल्या वापरकर्त्याच्या डेटाचा वापर करण्याचे अधिकार व्हॉट्सॲपकडे जाणार आहेत. त्यामुळे खासगीपणावर गदा येण्याची भीती वापरकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपने स्पष्टीकरण दिले असून कोणाच्या खासगीपणावर गदा येणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच फेसबुककडे पुढील माहिती शेअर केली जाणार नसल्याचेही व्हॉट्सॲपने स्पष्ट केले आहे.
वापरकर्त्यांना निर्धास्त राहण्याचे आवाहन
n व्हॉट्सॲप किंवा फेसबुक तुमचे खासगी संदेश पाहू शकणार नाही किंवा तुमचे खासगी दूरध्वनी ऐकू शकणार नाही.n तुम्हाला कोण सतत संदेश पाठवते किंवा दूरध्वनी करते याचीही नोंद व्हॉट्सॲप ठेवत नाहीn फेसबुक किंवा व्हॉट्सॲप तुम्ही इतरांना शेअर केलेले लोकेशन पाहू शकणार नाहीn तुमच्याकडील काँटॅक्टसची यादी व्हॉट्सॲप फेसबुककडे देणार नाहीn व्हॉट्सॲपवरील सर्व ग्रुप्सचचे खासगीपण जपले जाईलn तुम्ही तुमचे संदेश ठरावीक कालावधीनंतर अदृश्य होतील, अशी व्यवस्था करू शकालn तुम्ही तुमचा डेटा डाऊनलोड करू शकाल