सगळ्या जगाला आॅनलाइन शॉपिंगचे वेड व सवय लावून जगातील धनाढ्यांत गणले गेलेले अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हेदेखील आॅनलाइन शॉपिंग करीत असतील, असा समज होणे अगदी स्वाभाविक. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जेफ बेजोस यांना थेट बाजारात जाऊन वस्तू विकत घ्याव्या वाटतात. हा घ्या त्याचा पुरावा. सध्या बेजोस पत्नी व कुटुंबातील इतर सदस्यांसह इटलीत पर्यटनाला आले आहेत. बेजोस इटलीची राजधानी रोममधील प्रसिद्ध बाजारपेठेत शॉपिंग करताना दिसले. त्यांनी पत्नी मॅकेंजी हिच्यासाठी शॉपिंग केली व त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांना या शॉपिंगचे एवढे आकर्षण होते की अतिशय कडक ऊन आणि उकाड्याचीही त्यांनी पर्वा केली नाही. कँपो देई फियोरी मार्केटमध्ये बेजोस यांनी सुंदर फ्लॉवर बॉक्स व फळे विकत घेतली. त्यांनी स्वत:कडील फोन कॅमेऱ्यातून स्टॉल्सची छायाचित्रेही घेतली.
आॅनलाइन शॉपिंगचे वेड तिच्या संस्थापकाला नाही
By admin | Published: June 06, 2017 4:52 AM