लंडन : मानव, पक्षी, किडे किंवा प्राणी असेल. मुलांना जन्म देण्याची क्षमता केवळ मादीकडेच आहे. मात्र, यालाही एक अपवाद आहे. होय समुद्रीघोडा (सी हॉर्स) हा जगातील एकमेव असा जीव आहे जो नर असूनही मुले जन्माला घालण्यास सक्षम आहे. सी हॉर्स एक प्रकारचा मासा असून, तो घोड्यासारखा दिसतो. जगभरात सी हॉर्सच्या तीन डझन प्रजाती असून, त्यांचे सरासरी आयुर्मान १ ते ५ वर्षे असते. १५ ते ३५ सें.मी. एवढी लांबी असलेला हा मासा जगातील सर्व समुद्रांत १ ते १५ मीटर एवढ्या खोलीवर उष्ण आणि उथळ पाण्यात आढळून येतो. तो सरड्याप्रमाणे रंग बदलतो आणि डोळ्याच्या चारही बाजूंना पाहू शकतो. सी हॉर्सची मादी तिची अंडी नराच्या पिशवीत टाकते. त्यानंतर १० दिवस ते ६ महिन्यांच्या काळात पिलांचा जन्म होतो. सी हॉर्सपासून अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते.
मुलांना जन्म देणारा एकमेव पिता
By admin | Published: March 04, 2017 4:48 AM