रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:43 AM2024-10-29T06:43:21+5:302024-10-29T06:45:04+5:30

एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, लाेकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास काेणताही संघर्ष राेखण्यासाठी भारत आणि माेदींचा माेठा प्रभाव पडू शकताे. 

Only the Medes can stop the Russia-Ukraine war, believes Ukrainian President Zelensky | रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास

रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास

किव्ह : रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी हे माेठी भूमिका पार पाडू शकतात, याचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमीर झेलेन्स्की यांनी पुनरुच्चार केला. दुसरे युक्रेन शांतता संमेलन भारतात व्हावे, अशी आमची इच्छा असून, माेदींनी मनात आणल्यास ते करू शकतात, असे सांगतानाच रशियात झालेले ‘ब्रिक्स’ संमेलन अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.
एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, लाेकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास काेणताही संघर्ष राेखण्यासाठी भारत आणि माेदींचा माेठा प्रभाव पडू शकताे. 

‘ब्रिक्स’ संमेलनात एकतेचा अभाव
झेलेन्स्की म्हणाले, ‘ब्रिक्स’मध्ये ब्राझीलचे नेते पाेहाेचले नाही. तेथे अनेक देशांचे नेते उपस्थित हाेते. मात्र, बहुतांश असे हाेते, ज्यांच्यावर पुतिन यांना विश्वास नाही. साैदी अरबला संघटनेत सामील हाेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले हाेते. मात्र, पुतिन यांना साैदीला आपल्याकडे वळविता आले नाही. 

Web Title: Only the Medes can stop the Russia-Ukraine war, believes Ukrainian President Zelensky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.