अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीने त्याच्या डायपरमध्ये असलेल्या अतिजहाल विंचवाशी झुंझ दिली. या विंचवाने तब्बल बाळाला सात वेळा दंश केला. तरीही बाळाने या विषाचा सामना केला. या बाळाची प्रकृती स्थिर असून ते आता उपचार घेत आहे.
ब्राझीलमधील बहिया येथील ही घटना आहे. सोफिया फेरयर्रा असे या तीन दिवसांच्या बालिकेचे नाव आहे. तिच्या आईने सोफियाचा नॅपकिन नुकताच बदलला होता. या डायपरमध्ये विंचू लपल्याचा हासभासही तिला नव्हता. डायपर बदलल्यानंतर काही वेळातच सोफियाच्या तोंडातून फेस येऊ लागला. तसेच सोफियाची हालचालही मंदावली. यामुळे तिच्या आईने थेट हॉस्पिटल गाठले.
सोफियाच्या आईने सांगितले की, विंचवाने तिला सातवेळा दंश केल्याचे समजताच आम्ही तिच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. हा विंचू गटारीद्वारे घरात आला होता आणि सोफियाच्या डायपरमध्ये लपला होता.
या घटनेनंतर सोफियाच्या कुटुंबाने घरी जाण्याऐवजी पाहुण्यांकडेच जाणे पसंत केले. सोफियाचा पुनर्जन्म झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.