पुतिन यांचा आदेश न मानणाऱ्या सैनिकांना ही मॉडेल देणार "इनाम"; युक्रेनच्या समर्थनात केली विचित्र घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:34 PM2022-03-01T12:34:55+5:302022-03-01T12:36:11+5:30
रशिया आणि युक्रेनदरम्यान जबरदस्त युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी विविध प्रकारची पावले उचलली आहेत. ...
रशिया आणि युक्रेनदरम्यान जबरदस्त युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनी विविध प्रकारची पावले उचलली आहेत. मात्र, हे दोन्ही देश झुकण्यास तयार नाहीत. आता यासंदर्भात एका Onlyfans मॉडेलचे वक्तव्य समोर आले आहे. तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या मॉडेलने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा आदेश न मानणाऱ्या प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करेन, अशी ऑफर दिली आहे अथवा घोषणा केली आहे.
असं केलं ट्विट -
डेली स्टारच्या वृत्तानुसार, बॅड किट्टी अश्लील साइट्सवर लिली समर्स नावाने प्रसिद्ध आहे. ती पेशाने मॉडेलही आहे. तिने युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध रोखण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. लिली ने ट्विट केले आहे की, मी अशा प्रत्येक रशिय सैनिकासोबत सेक्स करेन, जे पुतिन यांचा आदेश झुकारून युक्रेन विरुद्धची लढाई बंद करतील.
नवी प्राइस लिस्ट -
या मॉडेलने अपल्या ट्विटसोबत युक्रेनचा फ्लॅग तयार केला, याच बरोबर हॅशटॅग #StandWithUkraine #RussiaUkraineConflict #Russia #peaceforukraine लिहिले. यानंतर तिने आणखी एक ट्विट केले. यात तिने लिहिले, माझी नवी प्राइस लिस्ट - एका मृत रशियनवर एक न्यूड, एक टँक नष्ट केल्यास एक व्हिडिओ, एक विमान पाडल्यास, मी त्या व्यक्तीसोबत झोपेन. ही नवी प्राइस गाइड युद्ध कात आहे, युक्रेन जिंदाबाद.
लोकांच्या आल्या अशा प्रतिक्रिया -
खरे तर तिचे अनेक फॅन्स तिची तारीफ करत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, एकिकडे जबाबदार नागरीक युद्धकाळात शांततेची झोप घेत आहेत. तर दुसरीकडे, किमान या मॉडेलने आपल्या पातळीवर काही करण्याचा विचार तर केला. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले, एकीकडे सैनिकांचा मृत्यू होत आहे आणि ही युद्धाला मजाक बनवत आहे.