प्रश्न: मला दोन आठवड्यात व्हिसासाठी मुलाखत द्यायची आहे. माझा पासपोर्ट नेमका कुठे पाठवला जाईल, हे मला कसे कळेल? पासपोर्ट माझ्यापर्यंत पोहोचावा, यासाठी कोणते पर्याय आहेत?
उत्तर- तुम्ही नेमकं कोणतं पिकअप लोकेशन निवडलं आहे, ते ustraveldocs.com वर जाऊन तपासू शकता.
तुमचा व्हिसा मंजूर झाला असल्यास, तो साधारणतः दोन ते पाच कार्यालयीन दिवसांत तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुमचा पासपोर्ट तयार असल्याची माहिती एसएमएस आणि इमेलद्वारे दिली जाते. तुमचा पासपोर्ट नेमका कुठे आहे, याची माहिती http://cdn.ustraveldocs.com/in/in-niv-passporttrack.asp वर मिळेल. तुमचा पासपोर्ट क्रमांक टाकल्यावर ती माहिती उपलब्ध होईल. तुम्ही ustraveldocs.com वर जाऊन पासपोर्ट डिलिव्हरीचा पत्ता बदलू शकता. पण तो तुम्हाला मुलाखतीच्या दिवशीच बदलावा लागेल.
कुरिअर सर्व्हिस किंवा होम डिलिव्हरीचे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. ऑनलाईन व्हिसा अर्ज काढताना तुम्ही 'प्रीमियम डिलिव्हरी सर्व्हिस'चा पर्याय निवडू शकता. त्याने पासपोर्ट तुमच्या घरी किंवा तुम्ही अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर येईल.
पाचशे रुपयांचं कॅश ऑन डिलिव्हरी शुल्क भरल्यावर पासपोर्ट होम डिलिव्हरी सर्व्हिस उपलब्ध आहे. जेव्हा कुरिअर तुमच्या घरी येईल, तेव्हा तुम्हाला सरकारकडून जारी करण्यात आलेलं ओळखपत्र दाखवावं लागेल. तुम्हाला कुरिअरने पासपोर्ट आणि इतर कागदपत्रं मिळाल्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं जाईल.
कुरिअर तुमच्यापर्यंत न पोहोचल्यास, त्याची डिलिव्हरी करण्यास आलेली व्यक्ती 'सॉरी कार्ड' आणि रेफरन्स नंबर देऊन जाईल. तुम्हाला ते कार्ड मिळाल्यास, कार्डवरील नंबरच्या मदतीने तातडीनं कुरिअर कंपनीशी संपर्क साधा.
तुम्ही व्हिसा अप्लिकेशन सेंटर किंवा ब्ल्यू डार्ट लोकेशनवरूनही पासपोर्ट मिळवू शकता. या सेवेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. तुमचा पासपोर्ट स्वीकारण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव देऊ शकता. तुमच्या कुटुंबाच्या सदस्याच्या बाबतीतही तुम्ही हा पर्याय निवडू शकता. तुम्ही एखाद्या व्यक्तीला पासपोर्ट स्वीकारण्याची परवानगी देत असाल, तर तुम्हाला तसं पत्र सर्व अर्जदारांच्या स्वाक्षऱ्यांसह द्यावं लागेल. याबद्दलची अधिक माहिती http://cdn.ustraveldocs.com/in/in-loc-passportcollection.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. व्हिसा अप्लिकेशन सेंटरमधून 14 दिवसांत (ब्ल्यू डार्टच्या लोकेशनवरून 7 कार्यालयीन कामकाजांच्या 7 दिवसांत) पासपोर्ट घेऊन न गेल्यास तो अमेरिकेच्या संबंधित दूतावासाकडे परत जातो. त्यानंतर अर्जदाराला त्याचा पासपोर्ट थेट अमेरिकेच्या दूतावासाकडून घ्यावा लागतो.