शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

ओरलैण्डो आणि नंतर...

By admin | Published: June 16, 2016 4:44 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेण्ट ओबामा यांच्यावर सरळसरळ केलेला हा संशयाचा वार आश्चर्यकारकरित्या ट्रम्प यांच्यावरच उलटण्याची चिन्हे असून बुधवारी सकाळी प्रसिध्द झालेल्या

अपर्णा वेलणकर, सान फ्रान्सिस्को
 
‘ही इज नॉट टफ, नॉट स्मार्ट ऐण्ड देअर इज समथिंग गोइंग ऑन इन हीज माईंड’
- ऑरलैण्डो येथील नाईट क्लबमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेनंतर गेले तीन दिवस अमेरिकेत धुमश्चक्री उडवून दिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रेसिडेण्ट ओबामा यांच्यावर सरळसरळ केलेला हा संशयाचा वार आश्चर्यकारकरित्या ट्रम्प यांच्यावरच उलटण्याची चिन्हे असून बुधवारी सकाळी प्रसिध्द झालेल्या जनमत चाचण्यांमधून ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत.
अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रायमरीजची फेरी सुरू झाल्यापासून  डेमोक्रैटिक पक्षाच्या इच्छुक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्यावर प्रथमच दोन आकडी ( बारा टक्के) मताधिक्याची आघाडी घेतली आहे.
ओरलैण्डो मधील घटनेनंतर  ‘रैडीकल इस्लाम’ असे शब्द उच्चारायला नकार दिल्याबद्दल ओबामा,  ‘न्यायप्रिय’ अमेरिकन नागरिकांच्या हातातली शस्त्रे काढून त्यांना संकटात ढकलण्याचा प्रस्ताव मांडल्याबद्दल हिलरी क्लिंटन आणि  ‘दहशतवादी पार्श्वभूमी’ असलेल्या सगळ्याच देशांमधून अमेरिकेला येऊ इच्छिणारे  ‘इमिग्रण्ट’ या सगळ्यांच्याविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी जणू आघाडीच उघडली आहे. ओबामा यांना क्लॉझेट मुस्लीम ( छुपे मुस्लीम समर्थक) ठरवण्यापासून सर्व मुस्लीमांना अमेरिकेची दारे बंद करण्याच्या घोषणांपर्यंतच्या त्यांच्या भडक, वाचाळ आणि अविचारी वक्तव्यांचे संदर्भच ओरलैण्डोच्या घटनेने बदलले आहेत. देशाचा असा  कडेकोट किल्ला करण्याच्या वल्गनांमधला पोकळपणा ताज्या हत्याकांडाने उघड केला असून त्यामुळेच ट्रम्प यांची आधीची जनप्रियता घसरणीला लागल्याचे निष्कर्ष विविध माध्यमांमधून मांडले जात आहेत.
अध्यक्षीय निवडणुकीच्या नामांकन फेरीची धामधुम ऐन कळसाला पोचलेली असताना एका मुस्लीम माथेफिरू  तरुणाने नाईट क्लबमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबाराची घटना ट्रम्प यांच्या पथ्थ्यावर पडणार आणि ते  ‘... सी? आय टोल्ड यू’ च्या स्वरात आधीच गोंधळलेल्या अमेरिकन मतदारांच्या मनातल्या भीतीवर फुंकर घालून त्यांना आपल्याकडे खेचणार, असे आडाखे बांधले जाणे स्वाभाविक होते. तसे झालेही! 
भारतात ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात नेमका मुहूर्त साधून  ‘घडणाऱ्या’ दंगलींशी परिचित असलेल्या देसी जन्तेने तर  ‘या ओमार मातीनला ट्रम्पनेच गन दिली नसेल कशावरून?’- असे मेसेजेसही फिरते ठेवले.
... पण मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधून, मुस्लीमांवर सरसकट प्रवेशबंदी लादून अमेरिकेतला दहशतवाद उखडण्याचे दावे करून जनमताला आपल्या बाजूने खेचणार्या ट्रम्प महाशयांच्या घोडदौडीला ओमारच्या माथेफिरू गोळीबाराने मात्र काहीसा लगाम लावल्याचे चित्र इथे अमेरिकेत दिसते आहे.
हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातल्या अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होत असताना आधीच तापलेले अमेरिकेतले राजकीय वातावरण ओरलैण्डो मधल्या घटनेनंतर आणखी चिघळणार आणि हा बदल आपल्या अतिरेकी वक्तव्यांनी जगाला अचंब्यात पाडणार्या ट्रम्प यांच्या पथ्थ्यावर पडणार अशा काळजीने ग्रासलेल्या राजकीय विश्लेषकांना अमेरिकेतील सामान्य नागरिकांच्या  ‘विवेकबुध्दी’ने काहीसा धक्का बसल्याचे त्यांच्या स्वरातून जाणवते आहे.
मुस्लीमांवर सरसकट प्रवेशबंदी लादण्याचे जोरदार समर्थन करून   ‘ओरलैण्डोच्या त्या नाईट क्लबमधल्या बाकीच्या लोकांकडे बंदुका असत्या तर ते ओमारला अडवू शकले असते आणि मग इतक्या मोठ्या संख्येने लोक मारले गेले नसते’’ असे नवे तर्कट मांडणार्या ट्रम्प यांना स्वपक्षीयांच्याही टीकेची धार आता सोसावी लागते आहे.
ट्रम्प यांच्या अविचारी भडकपणाने रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर माध्यमांपासून तोंड चुकवण्याची वेळ आली असून ट्रम्प म्हणतात तो मार्ग योग्य नव्हे असे स्पष्टपणे सांगणार्या नेत्यांची संख्या गेल्या दोन दिवसात वाढली आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षातली फुटही आता अधिक उघड होते आहे.
आज (बुधवारी) अमेरिकन सिनेटमध्ये अमेरिकेतल्या शस्त्रांच्या सहज उपलब्धतेवर बंदी/मर्यादा घालण्याबाबत (गन कंट्रोल) महत्वपूर्ण चर्चा नियोजित असून  ओरलैण्डो हत्याकांडाच्या ताज्या पार्श्वभूमीवर ‘ नो फ्लाय नो बाय’ या प्रलंबित विधेयकाला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न डेमोक्रैट्स करतील.