शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

...अन्यथा जगावर ओढवेल अन्नसंकट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जी-२० शिखर परिषदेत महासत्तांना शांततेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 7:18 AM

G20 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऊर्जा पुरवठ्यावर कोणत्याही निर्बंधांना प्रोत्साहन देऊ नका, युक्रेन वाद मुत्सद्देगिरीने सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जागतिक महासत्तांना केले.

बाली (इंडोनेशिया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऊर्जा पुरवठ्यावर कोणत्याही निर्बंधांना प्रोत्साहन देऊ नका, युक्रेन वाद मुत्सद्देगिरीने सोडविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जागतिक महासत्तांना केले. ते जी-२० शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करत होते. आजचे खत संकट उद्या अन्न संकटात बदलू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

खते आणि अन्नधान्य या दोन्हींची पुरवठा साखळी स्थिर ठेवण्यासाठी संयुक्त करार करण्यावरही त्यांनी भर दिला. वार्षिक जी-२० शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना, मोदींनी जागतिक महामारी कोविड-१९ दरम्यान देशातील १.३ अब्ज नागरिकांची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांनादेखील अधोरेखित केले. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रशियन तेल आणि वायू विकत घेण्याच्या विरोधात पाश्चिमात्य देशांनी केलेल्या आवाहनादरम्यान पंतप्रधानांनी ऊर्जा पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध न ठेवण्याचे आवाहन केले. 

हवामानबदल, कोविड-१९ जागतिक महामारी आणि युक्रेनच्या संकटामुळे निर्माण झालेली जागतिक आव्हाने यांनी जग उद्ध्वस्त केले आहे. जागतिक पुरवठा साखळी खिळखिळी झाली आहे. आजचे खत संकट उद्या अन्न संकटात बदलू शकते, त्यामुळे जगाला त्यावर उपाय शोधावा लागेल. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

युद्धविरामाचा मार्ग शोधापंतप्रधान म्हणाले की, युक्रेनमध्ये युद्धविरामाचा मार्ग शोधावा लागेल. गेल्या शतकात दुसऱ्या महायुद्धाने हाहाकार माजविला. नंतरच्या काळात नेत्यांनी शांततेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला. जगात शांतता, सौहार्द आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस व सामूहिक संकल्प ही काळाची गरज आहे. मला खात्री आहे की पुढच्या वर्षी गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींच्या भूमीवर जेव्हा जी-२०ची बैठक होईल तेव्हा आपण सर्व मिळून जगाला शांततेचा ठोस संदेश देऊ शकू.

मोदी-ऋषी सुनक यांची पहिल्यांदाच भेटजी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी प्रथमच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट ठरली. तत्पूर्वी, ऑक्टोबरमध्ये, पीएम मोदी आणि सुनक यांनी फोनवर बोलले आणि दोन्ही देशांमधील संतुलित आणि सर्वसमावेशक मुक्त व्यापार कराराच्या लवकर निष्कर्षाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला होता. 

अन् बायडेन यांनी मोदींना मारली हाकपरिषदेला सुरुवात होण्यापूर्वी व्यासपीठावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्वतः मोदींना भेटायला आले. प्रत्यक्षात बायडेन मोदींच्या दृष्टीपलीकडे होते. परंतु अचानक बायडेन पाठीमागून आले आणि त्यांनी मोदींना आवाज दिला. मोदींनी त्यांच्याकडे पाहिले आणि दोघांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. दोघांनी जवळ येत भेट घेतली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndonesiaइंडोनेशियाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय