वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले प्रशासन अतिशय उत्तमपणे काम करीत असल्याचे शुक्रवारी ठासून सांगतानाच ‘अप्रामाणिक’ प्रसारमाध्यमांनी काहीही म्हटले असले तरी व्हाइट हाऊसमध्ये कोणतीही गोंधळाची स्थिती नाही, असा दावा केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आमच्या प्रशासनाला सरकारमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रश्न आणि समस्या वारसानेच मिळाले आहेत हे तुम्हाला माहीत आहेच. माझ्याकडे अव्यवस्थेचाच वारसा आला आहे, असे सांगत ट्रम्प यांनी ओबामा प्रशासनावर टीका केली. मात्र, व्हाइट हाऊसमध्ये संपूर्ण गोंधळाची स्थिती असल्याचे वृत्तपत्रे वाचून आणि दूरचित्रवाणी वाहिन्या बघताच मला समजले, तेव्हा मला संताप आला, असेही ते म्हणाले. प्रशासन अगदी एखादे यंत्र सहजपणे चालावे तसे चालत असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही प्रचारात जी आश्वासने दिली होती, त्यानुसार आमचे प्रशासन काम करीत आहे. कारणे काहीही असतील, परंतु प्रसारमाध्यमे दुखी: असल्याने आमच्यावर हल्ले करायचा प्रयत्न करीत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प प्रसारमाध्यमांवर हल्ला चढवत आहेत. यावेळी मात्र त्यांनी आपले पूर्वाधिकारी असलेल्या बराक ओबामा यांच्या प्रशासनावरही सडकून टीका केली. (वृत्तसंस्था)नवा आदेश देणार च्वादग्रस्त ठरलेल्या सात मुस्लीम देशांतील नागरिकांना प्रवेशबंदी करण्याच्या आदेशाबद्दल न्यायालयांनी जी चिंता व्यक्त केली, त्यासंदर्भात नवा कार्यकारी आदेश पुढील आठवड्यात काढला जाईल, असे ट्रम्प म्हणाले. च्या देशातील नागरिक आणि सीरियातील निर्वासितांना तात्पुरती प्रवेशबंदी घालणारा आदेश ट्रम्प यांनी नुकताच दिला होता. त्याला न्यायालयांनी स्थगिती देऊन काही मुद्यांवर चिंता व्यक्त केली होती.
आमचे प्रशासन सहजपणे काम करतेय - डोनाल्ड ट्रम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2017 1:30 AM