बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलनांमुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडण्याची वेळ आली. यानंतर हा देश आता मवाल्यांचा अड्डा बनला आहे. येथे झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या निदर्शनांमागे बांगलादेशी कट्टरपंथी लोकांचा हात होता. हे कट्टरपंथी भारतविरोधी असून त्यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा पाठिंबा आहे. यांच्यामुळेच हा एक चांगली प्रगती करत असलेला देश उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.
आता अशाच काही बांगलादेशींमुळे एका अत्यंत आधुनिक युरोपीय देशात समस्या निर्माण झाली आहे. या देशाचे नाव आहे इटली. येथील मॉनफाल्कोन (Monfalcone) या छोट्या शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे बांगलादेशी मुस्लीम मजूरांची संख्या लक्षणीय आहे. हे मजूर मोठमोठी जहाजे बनवणाऱ्या एका कंपनीत काम करतात.
या बांगलादेशी लोकांमुळे मॉनफाल्कॉन उद्ध्वस्त होत असल्याचे बोलले जात आहे. हे एक अत्यंत सुंदर शहर आहे. येथील लोक अतिशय आधुनिक आहेत. मात्र, येथील महापौर ॲना मारिया सिसिंट यांचे म्हणणे आहे की, बाहेरील लोकांमुळे आमची ओळख नष्ट होत आहे. आमची संस्कृती धोक्यात आली आहे. महापौर मारिया या उजव्या विचारसरणीच्या पक्षाशी संबंधित आहेत.
शहराची लोकसंख्या केवळ 30 हजार -खरे तर हे एक अत्यंत छोटे शहर आहे. येथील लोकसंख्या केवळ 30 हजार एवढीच आहे. येथे 1990 च्या दशकापासून बांगलादेशी मुस्लीम कामगार येत आहेत. येथे फिनकँटियरी ही जहाज तयार करणारी सरकारी कंपनीही आहे. येथील लोकसंख्येत एकतृतियांश परदेशी मजूर आहेत.
क्रिकेटवर बंदी - बीबीसीसोबत बोलताना महापौर मारिया म्हणाल्या, परदेशी मजुरांमुळे आणची संस्कृती थोक्यात आली आहे. येथे राहणारे बांगलादेशी लोक क्रिकेट खेळतात. अशा परिस्थितीत येथे क्रिकेटवरही बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी आपल्याकडे निधी नसल्याचेही मारिया यांनी म्हटले आहे. तसेच क्रिकेटचा चेंडू अत्यंत धोकादायक असतो. यामुळे या खेळावर बंदी घालण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, येथे कोणी क्रिकेट खेळताना आढळल्यास त्याला 111 डॉलर्सचा दंड भरावा लागेल.
एवढेच नाही तर, बांगलादेशी मुस्लीम लोक इटालियन लोकांमध्ये मिसळण्यास लायक नाहीत. हे लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. यामुळे शहराची ओळख नष्ट होत चालली आहे, असेही मारिया यांनी म्हटले आहे.