भारत-अमेरिका संबंध : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांची ड्रॅगनला ग्वाहीवॉशिंग्टन : भारत व अमेरिका यांच्यात मैत्रीचे संबंध दृढ होत असले तरीही त्यामुळे चीनला कोणताही धोका नाही, अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी चीनला दिली आहे. पण त्याचबरोबर चीनने आपल्या सत्तेचा वापर सागरी सीमेवरून व्हिएतनाम व फिलिपाईन्स यासारख्या छोट्या देशांना धमकावण्यासाठी करू नये, असा इशाराही दिला आहे. अमेरिका -भारत मैत्रीमुळे चीनने घाबरून जाण्याची गरज नाही,कारण चीनचे भारताशी चांगले संबंध आहेत असे म्हणणे किंवा भारताने अमेरिकेच्या जाळ्यात सापडू नये असे केलेले वक्तव्य हे ऐकून आश्चर्य वाटले, असेही ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)चीनचा प्रतिसाद महत्त्वाच्या मुद्यावर चीनकडून कधी कधी प्रतिसाद मिळतो, तर कधी कधी काहीच प्रतिसाद नसतो. मला चीनच्या यशाची काळजी वाटते. चीनशी अमेरिकेचे नाते सकारात्मक असावे असे मला वाटते. चीनची दादागिरी चीनने गेल्या वर्षी भारताला दक्षिण चिनी समुद्रातील बेटांबाबत व्हिएतनामशी असलेल्या वादात लुडबूड करु नये असा इशारा दिला होता. संपूर्ण दक्षिण चिनी समुद्र आपला आहे असा चीनचा दावा आहे; पण ब्रुनेई, मलेशिया, फिलिपाईन्स, तैवान, व्हिएतनाम यांचा चीनच्या या दाव्याला विरोध आहे. असून या खनिज समृद्ध भागावर आपलाही दावा आहे असे या देशांचे म्हणणे आहे. सकारात्मक भारत भारताकडे असे काही पैलू आहेत, की ज्यामुळे अमेरिका व भारत यांचे नाते अधिक जवळचे आहे. भारत लोकशाही देश आहे आणि भारत व अमेरिका यांची काही मूल्ये समान आहेत. पण चीनची मूल्ये तशी नाहीत. मला जसे वाटते तशाच भावना अमेरिकन नागरिकांच्याही असतात असा माझा विश्वास आहे, असे ओबामा म्हणाले.