ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 11 - भारत आणि व्हिएतनाममध्ये संबंध सुधारत असल्याचे पाहून चीननं आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. भारत चीनचा सामना करण्यासाठी व्हिएतनामसोबत लष्करी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सीमा सुरक्षा क्षेत्रात अस्थिर वातावरण निर्माण होईल. तसेच आमचे हात काही बांधलेले नाहीत, असं चीनने भारताला ठणकावलं आहे. भारतानं व्हिएतनामला हवेत मारा करणारे आकाश मिसाइल विकण्याच्या वृत्तानंतर चीनचं पित्त खवळलं आहे.भारत सरकार चीनच्या विरोधात राजकीय करारांवर शत्रुत्वाची भावना ठेवत असल्यामुळेच व्हिएतनामशी लष्करी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील वातावरणात तणाव निर्माण होईल. चीनही हातावर हात ठेवून बसणार नाही, असा इशारा चीननं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या एका लेखातून दिला आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सच्या मते, भारताला एनएसजी सदस्य बनण्यापासून रोखण्यासोबत जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यापासून रोखल्यामुळे भारत या रणनीतीचा वापर करत आहे. भारताला महासत्ता व्हायचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला असलेला विरोध पाहता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणं कठीण आहे. भारताला दुस-या देशांशी व्यावहारिक संबंध वाढवण्याची गरज असल्याचं मत ग्लोबल टाइम्समधून मांडण्यात आलं आहे. चीन आणि भारतानं एकत्र काम केलं पाहिजे, असाही सल्ला लेखात देण्यात आला आहे.
(चीनला ठेचण्यासाठी भारत व्हिएतनामला देणार मिसाईल)(चीन पाकिस्तानला लागून असलेली सीमा करणार बंद)विशेष म्हणजे व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तायवानसारख्या देशांचा दक्षिण चिनी समुद्राच्या चीनच्या दाव्यावरून वाद आहे. चीन व्हिएतनाममधल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ व्हिएतनामला आमिष दाखवून फूस लावण्याचाही प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.