गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत १४०० हून अधिक इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोकांना ओलीस ठेवले होते. हमासने ओलीस ठेवलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांनी आता बेंजामिन नेतन्याहू सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. सरकारविरोधात पोस्टर, बॅनर घेऊन लोक रस्त्यावर उतरले आहेत. देशाच्या विविध भागात लोक हे प्रदर्शन करत आहेत. अनेक दिवसांपासून ओलिस ठेवलेले लोक अद्यापही त्यांच्या घरी पोहोचले नाहीत, त्यामुळे लोक संतापले आहेत.
...तर हजारो रुग्णांचा होऊ शकतो मृत्यू; पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडण्याचे इस्रायलचे आदेश
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या परिस्थीती हाताळण्याच्या पद्धतीवर अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. नेतन्याहू यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे.
आंदोलकांनी नेतन्याहू यांच्यावर इस्रायली नागरिकांचे संरक्षण करण्यापेक्षा त्यांच्या राजकीय अस्तित्वाची अधिक काळजी घेण्याचा आरोप केला. काही इस्रायलींनी नेतन्याहू यांनी ओलिसांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचत नसल्याची टीकाही केली आहे. शेकडो लोक तेल अवीवमधील संरक्षण मंत्रालयाबाहेर हमासने ओलिस घेतलेल्या लोकांपैकी एकाच्या कुटुंबातील सदस्याने सुरू केलेल्या निषेधात सामील झाले.
गेल्या शनिवारी हमासने मोठा हल्ला चढवल्यानंतर १,४०० हून अधिक लोक मारले गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या किंवा पकडलेल्या लोकांची नावे आणि फोटो अनेक निषेधार्थींनी ठेवली होती. निदर्शनादरम्यान इतरांनी इस्रायली झेंडे आणि बॅनर फडकावले आणि म्हटले की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू विनाशकारी अपयशास जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा.