बिजिंग : गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. गलवानमधील हिंसक झटापटीत भारताच्या 20 शूर जवानांना वीरमरण आले होते. चीनचे 43 हून अधिक सैनिक मारले गेले होते. 15 जूनच्या रात्री झालेल्या या झटापटीनंतर लडाखमध्ये दोन्ही सैन्यांतील तणाव वाढला आहे. या झटापटीत शहीद झालेल्या जवानांचा आकडा भारत सरकारनं जाहीर केला आणि संपूर्ण देशानं त्यांना श्रंद्धाजली वाहिली. पण, चीननं त्याचं किती जवान मारले गेले हे सांगितले नाही. प्रत्यक्षात हा आकडा अधिक असल्याचे समोर येत आहे.
सोमवारी सोशल मीडियावर '#100 Chinese' आणि '#GalwanValley' हे ट्रेंड सुरू होते. त्यामागचं कारण शोधल्यावर एक धक्कादायक बातमी समोर आली. गलवान झटापटीत चीनचे १०० सैनिक मारले गेले आहेत, पण चिनी सरकार ही आकडेवारी लपवत आहे. सत्य समोर आल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर नामुष्की ओढावेल, असा दावा करून चीनच्या कम्युनिस्ट पार्टी प्रमुखाचा मुलगा आणि चिनी सैन्यातील माजी अधिकारी यांग जिनाली यांनी खळबळ उडवून दिली आहे. याबाबत भारताकडून किंवा चीनकडून कुणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही, पण सोशल मीडियावर जोरदार चर्चेला सुरूवात झाली आहे..
दरम्यान, याच भागातून आता चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेल्याचं वृत्त 'द हिंदू'नं दिलं आहे. यानंतर ३० जूनला दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाची बैठक झाली. त्यानंतर चिनी सैन्य मागे हटलं की नाही, याची पडताळणी करण्यासाठी रविवारी एक सर्वेक्षण करण्यात आलं. 'गलवान खोऱ्यातील झटापट झालेल्या भागापासून चिनी सैन्य दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. या भागात उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामं हटवण्याचं काम दोन्ही देशांच्या सैनिकांकडून सुरू आहे,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारतीय क्रिकेटपटूंना ओळखलंत का? अष्टपैलू खेळाडूनं शेअर केला पहिल्या मुलाखतीचा व्हिडीओ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!
पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय खेळाडू आमची माफी मागायचे - शाहिद आफ्रिदी
बाबो! 89व्या वर्षी 'बाप' झाला माजी खेळाडू अन् म्हणाला, 'पुढील वर्षीही पाळणा हलवणार'
सचिन तेंडुलकर ओपनिंगला नॉन स्ट्राइकवर का रहायचा? सौरव गांगुलीनं सांगितलं कारण
विनोद राय यांचा खुलासा; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड होता पहिली पसंती, पण...