टोकियो : शक्तीशाली चक्रीवादळ जपानची राजधानी टोकियोजवळ पोहोचले असून मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वारा सुटल्यामुळे ४०० हून अधिक विमानांना सोमवारी येथून उड्डाण करता आले नाही. अधिकाऱ्यांनी भुस्खलन आणि पुर येण्याचा इशारा दिला आहे. शक्तीशाली चक्रीवादळ मिनडुले दुपारी साडेबारा वाजता टोकियोपासून ८० कि. मी.वरील ताटेयामा शहरात पोहोचले असल्याचे जपानच्या हवामान खात्याने सांगितले. वादळामुळे आतापर्यंत मोठी हानी किंवा कोणी दगावल्याचे वृत्त नाही. (वृत्तसंस्था)>१८५ देशांतर्गत उड्डाणे रद्द केली असून त्याचा ३३, ६९२ प्रवाशांना फटका बसला तर आॅल निप्पोन एअरवेजने ११२ देशांतर्गत उड्डाणे रद्द केल्यामुळे २६ हजार ५०० प्रवाशांचा खोळंबा झाला. राजधानी टोकियोसह आसपासच्या क्षेत्रात सुपरफास्ट बुलेट ट्रेनसह प्रमुख रेल्वेसेवा सुरळित सुरू असल्याचे पूर्व जपान रेल्वेने म्हटले आहे. काही मार्गांवर क्षणिक विलंब आणि अडथळे येत असले तरी रेल्वेसेवा अबाधित आहे, असे सूत्रांनी सांगितले. वादळामुळे टोकियोत भुस्खलन आणि पुराचा धोका आहे. सखल भाग जलमय होऊ शकतात. नद्यांची पाणिपातळी झपाट्याने वाढत असून मोठमोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधानता बाळगा, असे हवामान खात्याने सांगितले आहे. ग्रेटर टोकियो भागात मुसळधार पावसामुळे नद्या तट्ट फुगल्या आहेत. पुराचे पाणि नद्यांचे काठ कधीही फोडू शकते, अशी स्थिती आहे. वादळामुळे ४२५ विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून त्यातील बहुतांश उड्डाणे टोकियो विमानतळावरून होणारी आहेत.
चक्रीवादळामुळे जपानमध्ये ४०० हून अधिक उड्डाणे रद्द
By admin | Published: August 23, 2016 5:20 AM