शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी

By सायली शिर्के | Updated: September 24, 2020 15:54 IST

कारवांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरनेस्‍ट गार्सिया-2 यांनी एका दिवसात तब्बल 51,471 कोटींची म्हणजेच जवळपास 7 बिलियन डॉलर्सची  तगडी कमाई केली आहे.

कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात करोडपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. जुन्या कार विकून करोडपती झाल्याची घटना घडली आहे.  जुन्या कार विकणारी कंपनी कारवां (Carvan Co.) चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरनेस्‍ट गार्सिया-2 यांनी एका दिवसात तब्बल 51,471 कोटींची म्हणजेच जवळपास 7 बिलियन डॉलर्सची  तगडी कमाई केली आहे. शेअर बाजारात तेजी आल्याने त्यांना मोठा फायदा झाला आहे. 

अरनेस्‍ट गार्सिया-2 आणि त्यांचा मुलगा अरनेस्‍ट गार्सिया-3 हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सने (Bloomberg Billionaires Index) दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची एकूण संपत्ती ही आता 1,58,825 कोटींहून अधिक झाली आहे. अरनेस्ट गार्सिया-2 यांच्या वडिलांचं न्यू मेक्सिकोमध्ये दारूचं दुकान होतं. अरनेस्ट गार्सिया-2 यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडलं होतं. मात्र नंतर त्यांनी एरिझोना युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. 

जुन्या कार विकणाऱ्या कंपनीचा मालक करोडपती

1991 साली त्यांनी कार भाड्याने देणारी कंपनी अग्ली डकलिंग (Ugly Duckling) खरेदी केली.गार्सिया-2 यांनी ही कंपनी खरेदी केल्यानंतर त्या माध्यमातून जुन्या कार विकायला सुरुवात केली. ही कंपनी अशा लोकांना कार विकते ज्यांना क्रेडिट स्कोर लक्षात घेता कोणती बँक कार लोन देत नाही. त्यानंतर त्यांचा बिझनेस हा झपाट्याने वाढू लागला. 1996 मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचं लिस्टिंग NASDAQ मध्ये केलं. तसेच आपल्या कंपनीचं नाव बदलून त्यांनी Carvana Co. ठेवलं.

कंपनीचं दरवर्षी 20 लाख जुन्या कार विकणं लक्ष्य

कोरोनाच्या काळात अमेरिकेत वापरलेल्या कारची मागणी वाढू लागली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये यावर्षी आतापर्यंत 150 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अरनेस्ट गार्सिया-2 यांची संपत्ती 15 अब्ज डॉलर्स झाली आहे. अरनेस्ट गार्सिया-3 कारवांचे सीईओ असून त्यांची संपत्ती आता 6.21 बिलियन डॉलर्स झाली आहे. दरवर्षी 20 लाख जुन्या कार विकणं हे कंपनीचं लक्ष्य आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! 15 लाखांची रोकड अन् 70 कोटींचं घबाड; पोलीस अधिकाऱ्याची संपत्ती पाहून सर्वांचीच उडाली झोप

क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; कापली जीभ 

'मी मास्क घालत नाही' म्हणणाऱ्या भाजपा नेत्याचा यू-टर्न, म्हणाले...; Video व्हायरल

"गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण; हेच आहे मोदीजींचं शासन", राहुल गांधींचा घणाघात

लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च

टॅग्स :carकारAmericaअमेरिकाMONEYपैसा