नैरोबी : लैंगिक छळाचा आरोप असलेले हवामान बदलावरील आंतरसरकारी तज्ज्ञगटाचे (आयपीसीसी) अध्यक्ष राजेंद्र के. पचौरी यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. आयपीसीसीचे ४१ वे संमेलन आजपासून येथे सुरू झाले. या संमेलनातच पचौरींनी राजीनामा दिल्याचे जाहीर करण्यात आले. पचौरी हे या संमेलनाला उपस्थित राहिले नाहीत. पचौरी प्रमुख असलेल्या ‘टेरी’तील कर्मचारी महिलेने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावरून दिल्ली पोलिसांनी पचौरींविरुद्ध विनयभंग व लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीसीने नियमानुसार उपाध्यक्ष इल गिझोउली यांच्याकडे आयपीसीसीच्या प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.(वृत्तसंस्था)
पचौरी यांचा राजीनामा; बैठकीला जाणे टाळले
By admin | Published: February 24, 2015 11:23 PM