नवी दिल्ली : वाहनांच्या गर्दीशिवाय मोठ्या शहरांची कल्पना करणे कठीण झाले आहे. परंतु, आता लवकरच ‘हवाई टॅक्सी’ सेवा येत असून, रोजनचा प्रवास वेगवान होणार आहे. याचवेळी ही सेवा इलेक्ट्रिक बॅटरीवर असल्याने प्रदूषणाच्या समस्याही दूर होणार आहेत. जगात अनेक कंपन्या सरळ उभे ९० अंशाच्या कोनात उडू आणि उतरू शकणारी विमाने विकसित करत आहेत. त्याला ‘इलेक्ट्रिक हवाई टॅक्सी’ देखील म्हणतात. फ्रान्स, जर्मनी, चीन, अमेरिका अशा अनेक देशांनी येत्या वर्षभरात हवाई टॅक्सी सुरू करण्याची योजना आखली आहे. याचा मोठा फायदा जगाला होणार आहे.
भारताकडूनही तयारी...वाहतुकीतील अडथळ्यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे अंदाजे १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे भारत ईव्हीटीओएल विमान उत्पादकांना आमंत्रित करण्याची शक्यता पडताळून पाहत आहे.
आव्हान काय?महागडी आणि जड बॅटरी ही सर्वात मोठी समस्या आहे. व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यापूर्वी, हवाई टॅक्सीला व्यावसायिक विमानांप्रमाणेच प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करावी लागेल.
ब्राझील ते इस्रायल स्पर्धेतब्राझीलमध्ये २०२६ पासून फ्लाइंग टॅक्सी सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीन २०२५ पर्यंत फ्लाइंग टॅक्सी सुरू करण्याची योजना आखत आहेत. या स्पर्धेत इस्रायलही सामील झाला आहे.
किती खर्च?२०४० पर्यंत ईव्हीटीओएलवरील जागतिक खर्च १०,००० कोटी रुपयांपर्यंत (एक ट्रिलियन डॉलर) पोहोचण्याचा अंदाज आहे.२०२५ पर्यंत अमेरिकेचे प्रवासी ईव्हीटीओएल बाजारपेठ ३.४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.२ अब्ज डॉलर सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप कंपनी जॉबीने आपल्या गुंतवणूकदारांकडून हवाई टॅक्सी सेवेसाठी जमा केले आहेत.