पणजी : गोवा डेअरी सरकारला तब्यात घ्यावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिला. सरकारला अंधारात ठेवून दुधाचे दर वाढविण्यात आले असून एकूणच कारभाराची चौकशी करण्यात येईल, असे पर्रीकर यांनी सांगितले. तसेच दोन्ही जिल्ांत प्रत्येक एकेक डेअरी उभारण्याचा विचारही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार विष्णू वाघ यांनी आणलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना पर्रीकर विधानसभेत बोलत होते. दूध उत्पादन वाढविण्याचे सोडून डेअरी भलतेच उद्योग करीत आहे. सरकारने १८ कोटींचा पशुखाद्य प्रकल्प दिला तरी दूध उत्पादन वाढलेले नाही. लिटरमागे ९ रुपये ४० पैसे सरकार देते तरी काही फायदा नाही. डेअरी व्यवस्थापनाशी मागे चर्चा करून लिटरमागे २ रुपये दर कमी करण्याचे निर्देश दिले; परंतु नंतर व्यवस्थापनावरील पदाधिकार्यांनी तोंडच दाखवले नाही. आता दर वाढवले आहेत. त्याबाबतही सरकारला विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप पर्रीकर यांनी केला. आमदार नरेश सावळ यांनी नवी दुग्ध उत्पादक सोसायटी आणण्यापेक्षा तीच डेअरी ताब्यात घ्या, ती जगवा अन्यथा सहकार क्षेत्रास कलंक लागेल, असे नमूद केले. राज्यात दुधाचा पुरवठा करण्यासाठी सहकारी तत्त्वावर चालणारी दूध उत्पादक सोसायटी आधीच अस्तित्वात असताना नव्या सोसायटीची गरज काय? असा सावल आमदार विष्णू वाघ यांनी केला. नवी दुग्ध सोसायटी स्थापन करण्यासाठी सरकारने केंद्राकडे परवानगी मागितल्याच्या वृत्ताने दूध उत्पादक व सोसायट्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे वाघ म्हणाले. सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी अशी माहिती दिली की, गोव्याची दुधाची दिवशी गरज साडेतीन लाख लीटर आहे. पैकी ७८ हजार लिटर दुधाचेच उत्पादन होते. ५५ हजार लिटर दूध स्थानिक शेतकर्यांकडून मिळते. आमदार विष्णू वाघ यांनी सध्याच्या डेअरीचाच विस्तार करावा, अशी सूचना केली. (प्रतिनिधी)
पान ३- गोवा डेअरी ताब्यात घेऊ पर्रीकरांचा इशारा : दूध दरवाढ सरकारला अंधारात ठेवून
By admin | Published: August 05, 2014 8:24 PM