काही दिवसापूर्वी इस्त्रायलने लेबनॉनमध्ये कार्यरत असलेल्या हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेवर तांत्रिक युद्धाच्या माध्यमातून हल्ला केला होता. इस्रायलने हिजबुल्लाहच्या सैनिकांनी वापरलेले पेजर आणि वॉकी-टॉकी यांचा स्फोट केला होता. या स्फोटांमध्ये सुमारे ५० जणांचा मृत्यू झाला होता, यात सुमारे ३००० लोक जखमी झाले होते. हिजबुल्लाला जोरदार झटका दिला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटामुळे हिजबुल्लाहचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. युद्धातून १५०० सैनिकांनी माघार घेतली आहे.
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...
इस्रायलच्या पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटांमुळे अनेकांची दृष्टी गेली. तर अनेकांना हात गमवावे लागले. अमेरिकन काँग्रेसच्या अहवालानुसार, हिजबुल्लाहकडे ४० ते ५० हजार लढवय्ये आहेत. हा एक मोठा आकडा आहे. हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह म्हणला की, आमच्याकडे एक लाखाहून अधिक लढवय्ये आहेत. पेजर आणि वॉकी-टॉकी बॉम्बस्फोटांबद्दल इस्रायलने आतापर्यंत काहीही सांगितले नाही.पण लेबनॉनने यात इस्त्रायलचा हात असल्याचे म्हटले आहे.
तेव्हापासून इस्रायलचे लेबनॉनवर हवाई हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये सुमारे ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनमधील शिया समुदायाच्या नेतृत्वाखालील सरकार कोंडीत सापडले आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, ते हिजबुल्लाहवर हल्ले सुरूच ठेवतील आणि हमासप्रमाणेच त्याचा नाश करेल. मंगळवारी इस्रायलकडून असे अनेक फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये लेबनॉनमधील घरांमध्ये क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे ठेवण्यात आली होती. इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहच्या एका कमांडरचाही मृत्यू झाला आहे.