Pahalgam Attack Update ( Marathi News ): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात काल मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था ॲक्शनमोडवर आल्या आहेत, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे बारामुल्ला परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले, हल्ल्यानंतर काही तासातच गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले. दरम्यान, आता पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईकची भीती घेतली आहे. कालपासूनच पाकिस्तानने हवाई दलाला अलर्ट दिला आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने गस्त वाढवला आहे. ( Pahalgam Attack Update )
दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करून २६ जणांची हत्या केली आहे. देशाच्या विविध भागांतून काश्मीरला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली. या हल्ल्यानंतर लोक सरकारकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत. देशभरातून अशाच प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शनमोडवर आले आहेत. पीएम मोदी यांनी आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ( Pahalgam Attack Update )
पाकिस्तानचे हवाई दल रात्रीपासूनच अलर्ट
पहलगाम हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकडी भीती वाटत आहे. भारतीय कारवाईच्या भीतीने पाकिस्तानी हवाई दल रात्रभर सतर्क राहिले. फ्लाइट रडार डेटामध्ये नोंदवलेल्या पाकिस्तान हवाई दलाच्या असामान्य हालचालींवरून हे उघड झाले आहे.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार २४ चे स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर समोर आले आहेत. स्क्रीनशॉटमध्ये कराची येथील सदर्न एअर कमांडमधून लाहोर आणि रावळपिंडीजवळील उत्तरेकडील तळांवर उड्डाण करणारे पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख विमान दाखवण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून हल्ल्यावर प्रतिक्रिया
दरम्यान, पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त म्हणून काम केलेले अब्दुल बासित यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'वर पोस्ट केली. "मला खात्री आहे की पाकिस्तानविरुद्धच्या कोणत्याही भारतीय गैरसमजुतींना रोखण्यासाठी इस्लामाबाद सर्व शक्य उपाययोजना करत आहे. मला यात काही शंका नाही की यावेळी पाकिस्तानची प्रतिक्रिया खूपच कठोर असेल." ( Pahalgam Attack Update )