इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधकांचा शनिवारी रात्री सुरक्षा दलांशी संघर्ष होऊन ३ जण ठार, तर ५०० पेक्षा जास्त जखमी झाले. राजधानीतील वाढती हिंसा लक्षात घेऊन लष्कराने तातडीची बैठक घेतली. यामुळे पाकमधील घडामोडी निर्णायक अवस्थेत पोहोचल्या असल्याचे समजले जात आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या निवासस्थानाकडे जाणारे अडथळे निदर्शकांनी शनिवारी रात्री उशिरा तोडल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. रविवारी सकाळी तो थंडावला. पाकिस्तान तहरिक ए इन्साफचे प्रमुख इम्रान खान व पाकिस्तान अवामी तहरिकचे मौलवी ताहिरूल कादरी यांनी नवाज शरीफ यांनी राजीनामा देईपर्यंत लढण्याची शपथ घेतली आहे. (वृत्तसंस्था)
पाक पेटले; लष्कराची तातडीची बैठक
By admin | Published: September 01, 2014 4:04 AM