इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानच्या अनेक भागांना रविवारी बसलेल्या ७.१ रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने १ जण ठार झाला, तर ९ जण जखमी झाले. अनेक लोक भीतीने घरातून बाहेर पडले. दिल्ली, पंजाब, हरियाणा व काश्मीरसह भारताच्याही अनेक भागांत या भूकंपाचे धक्के जाणवले. पण मोठी पडझड अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. १०-१५ सेकंद टिकलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदू-कुश पर्वत रांगांमध्ये अफगाणिस्तान व ताजिकिस्तानच्या सीमेवरील भागात २३६ किलोमीटरवर होता, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीरसह खैबर पख्तुनख्वॉ, पंजाब, गिलगिट भागात हा धक्का बसला. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने हा धक्का रिश्टर स्केलवर ६.६ तीव्रतेचा होता, असे म्हटले. भूकंपाचे केंद्र पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर अफगाणिस्तानच्या अश्कशामनजीक २१० किलोमीटर खोलीवर होते असे या केंद्राने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
पाकमध्ये भूकंपाचा १ बळी
By admin | Published: April 11, 2016 3:27 AM