शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पाकने काश्मिरींना चिथवावे -मुशर्रफ

By admin | Published: October 22, 2014 5:08 AM

पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकली असून काश्मिरात लढत असलेल्यांना पाकने चिथावणी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकली असून काश्मिरात लढत असलेल्यांना पाकने चिथावणी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.पाक लष्कराशिवाय काश्मिरात आमचा आणखी एक स्रोत असून तो म्हणजे भारताविरुद्ध लढणारे तेथील लोक. आम्ही त्यांना केवळ चिथावणी देण्याची गरज आहे, असे मुशर्रफ म्हणाले.देशद्रोहाच्या खटल्यामध्ये सध्या जामिनावर असलेले मुशर्रफ एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.लष्कर भारतासोबत युद्ध करण्यास तयार असून पाकमधील एक लाख लोकदेखील काश्मीरसाठी लढू इच्छितात. पाक प्रत्युत्तर देऊच शकणार नसल्याच्या भ्रमात भारताने राहू नये, असे मुशर्रफ म्हणाले.१९९९ मध्ये कारगिल संघर्षानंतर लगेचच मुशर्रफ यांनी पाकची सत्ता हस्तगत केली होती. काश्मिरात आम्ही भारतीय लष्कराशी समोरून तद्वतच मागून अशा दोन्ही बाजूंनी लढू शकतो, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)