वॉशिंग्टन : भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेला अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानातील अतिरेकी भारतावर हल्ले करू शकतात, अशी भीती अनेक देशांना आहे, असे अमेरिकेने मंगळवारी म्हटले.डिफेन्स फॉर इंडो-पॅसिफिक सिक्युरिटी अफेअर्सचे सहायक संरक्षणमंत्री रँडॉल श्रीव्हर यांनी सांगितले, अतिरेकी गटांकडून सीमेपलीकडे हल्ले होऊ शकतात, त्यामुळे पाकिस्तानने या गटांना नियंत्रणात ठेवायला हवे. अशा प्रकारचा संघर्ष व्हावा असे चीनला वाटत असेल किंवा तो त्याला पाठिंबा देईल, असे वाटत नाही, असे श्रीव्हर म्हणाले.भारताच्या काश्मीरबद्दलच्या निर्णयावरून चीनने पाकला पाठिंबा दिला आहे. त्याविषयीच्या प्रश्नावर श्रीव्हर म्हणाले, ‘चीनचा पाकला असलेला पाठिंबा हा मुत्सद्देगिरीचा व राजकीय आहे. चीनने पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करावा की करू नये, यावर काही चर्चा झाली तर चीन पाठिंबा देईल. परंतु त्यापलीकडे सक्रियपणे काही झाले, असे वाटत नाही, असे श्रीव्हर म्हणाले.
पाकचे अतिरेकी करू शकतात भारतात हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 6:40 AM