शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पाक सर्वांत धोकादायक

By admin | Published: February 17, 2017 12:57 AM

पाकिस्तान जगासाठी सर्वात धोकादायक देश आहे. कोलमडलेली अर्थव्यवस्था, दहशतवाद आणि वेगाने वाढणारा अण्वस्त्र साठा

वॉशिंग्टन : पाकिस्तान जगासाठी सर्वात धोकादायक देश आहे. कोलमडलेली अर्थव्यवस्था, दहशतवाद आणि वेगाने वाढणारा अण्वस्त्र साठा यामुळे उत्पन्न होणाऱ्या संभाव्य धोक्यांनी पाकला सर्वात धोकादायक देश बनविले, असे अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएच्या माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तान अपयशी ठरला, तर जगासमोर संकट उभे ठाकू शकते, असा इशारा सीआयएचे इस्लामाबादेतील माजी केंद्रप्रमुख केविन हल्बर्ट यांनी दिला आहे. पाकिस्तान एका अशा बँकेसारखा आहे जो एवढा मोठा आहे की, अपयशी व्हायला नको किंवा एवढा मोठा आहे की, त्याला कोणी अपयशी होऊ देणार नाही. कारण, तो अपयशी ठरला, तर त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर विध्वंसक परिणाम होऊ शकतो. (वृत्तसंस्था)३ कोटी ३० लाख लोकसंख्येच्या अफगाणिस्तानात मोठ्या समस्या आहेत. मात्र, पाकिस्तानात १८.२ कोटी लोक असून, त्याची लोकसंख्या अफगाणिस्तानच्या पाच पट आहे, असेही ते म्हणाले. पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक देश नाही. मात्र, तो जगासाठी सर्वात धोकादायक देश असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात आज खूप काही करण्याची गरज आहे. आम्ही त्याला जर एकटे पाडले किंवा त्याच्यावर निर्बंध लादण्याची धोरण अवलंबले, तर त्याची स्थिती आणखी खराब होईल, असेही ते म्हणाले.बंदी उठविण्याची सईदची मागणीलाहोर : आपल्याला देशाबाहेर जाण्यास घालण्यात आलेली बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी जमात- उद- दावाचा प्रमुख हाफीज सईद याने केली आहे. आपल्यापासून सुरक्षेला धोका नाही तसेच आपली संघटना कधीही दहशतवादी कृत्यांत सहभागी झालेली नाही, असा दावा त्याने केला. देशाबाहेर जाण्यास बंदी असलेल्या ३८ लोकांच्या यादीत सईदच्या नावाचा समावेश आहे. या यादीबाबतचे ३० जानेवारी २०१७ चे निवेदन मागे घेतले जावे, असे सईदने गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सईद मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे.सईदची सुटका करा - मुशर्रफहाफीज सईद याची नजररकैदेतून सुटका करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे. सईद याची संघटना एक चांगली स्वयंसेवी संघटना असून, मदतकार्यात अग्रेसर आहे. सईद दहशतवादी नाही. ते एक स्वयंसेवी संस्था चालवीत असून, पाकमधील भूकंप आणि पूर संकटाच्या वेळी त्यांच्या संघटनेने मोठे काम केले आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांची सुटका केली गेली पाहिजे, असेही ते म्हणाले. अल-काईदा भारतात विस्तारतोय पाळेमुळेवॉशिंग्टन : अमेरिका इस्लामिक स्टेटशी लढण्यात व्यग्र असल्याचा फायदा घेत अल-काईदा दक्षिण आशियात पुन्हा आपले हातपाय पसरू लागला असून, भारतात आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्याच्या तयारीत आहे, असा इशारा ज्येष्ठ अमेरिकी संसद सदस्यांनी दिला आहे. जॉर्जटाऊन विद्यापीठात सेंटर फॉर सेक्युरिटी स्टडीज्चे ब्रूस हॉफमॅन म्हणाले की, अल-काईदा कधीही बदलली नाही. आपण पाश्चात्त्य देशांविरुद्ध विशेषकरून अमेरिकेविरुद्ध अस्तित्वाची लढाई लढत आहोत, असे आजही या संघटनेला वाटते.