शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

रशियाहून परतताच इम्रान खान यांची खूर्ची धोक्यात आली; लगेच आर्मीची आठवण झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 10:38 AM

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मंगळवारी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव संसदेत सादर केला आहे.

इस्लामाबाद-

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मंगळवारी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव संसदेत सादर केला आहे. यात देशातील अनियंत्रित महागाईसाठी सरकारला जबाबदार धरत इम्रान खान यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. "पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या सुमारे १०० खासदारांनी स्वाक्षरी केलेला ठराव नॅशनल असेंब्ली सचिवालयात सादर करण्यात आला आहे", अशी माहिती पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) च्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी दिली आहे. 

"इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय आम्ही पाकिस्तानच्या लोकांसाठी घेतला आहे, आमच्यासाठी नाही", असं पीएमएल-एनचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ म्हणाले. शरीफ यांच्यासोबत जमियत उलेमा-ए-इस्लाम फजल (जेयूआय-एफ) प्रमुख मौलाना फजलुर रहमानही उपस्थित होते. नियमांनुसार, अधिवेशन बोलावण्यासाठी संसदेच्या किमान ६८ सदस्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी तीन ते सात दिवसांचे अधिवेशन बोलविण्याची तरतूद आहे.

इम्रान खान कसे हटणार?पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हटवण्यासाठी विरोधकांना ३४२ सदस्यांपैकी सभागृहात १७२ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. इम्रान खान आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. काही मित्रपक्षांनी बाजू बदलण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांना काढून टाकले जाऊ शकते, जे संसदीय लोकशाहीत असामान्य गोष्ट नाही. त्याचवेळी, ताज्या घडामोडींवर खान म्हणाले की, "देशाचे सैन्य त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना विश्वास आहे की सरकार टिकेल" 

"लष्कर माझ्या पाठीशी उभी आहे, ते कधीही चोरांना साथ देणार नाही आणि लोक आता विरोधकांना साथ देत नसल्यामुळे सत्तास्थापने त्यांना साथ देत असल्याचा दावा करत आहेत", असं पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

काहीच होणार नाही, इम्रान खान यांना विश्वास"2028 पर्यंत या सरकारच्या विरोधात काहीही होणार नाही. विरोधकांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागेल. अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या खासदारांना १८ कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे", असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. मी त्यांना पैसे घेऊन गरिबांमध्ये वाटण्यास सांगितलं असल्याचा टोलाही खान यांनी विरोधकांना लगावला. सरकार पाडण्याच्या प्रयत्नांमागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा पुनरुच्चार करत खान यांनी ज्यांना स्वतंत्र परराष्ट्र धोरण नको आहे ते अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देतील, असं म्हटलं आहे. 

सत्ताधारी पक्षात बंडखोरीचा दावादेशातील गरीब जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या अनियंत्रित महागाईचा ठपका विरोधी पक्षांनी इम्रान सरकारवर ठेवला आहे. दुसरीकडे, खान यांनी विरोधी पक्षांवर आरोप केला की ते प्रमुख विरोधी नेत्यांच्या कथित भ्रष्टाचाराला माफ करण्यास तयार नसल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खान यांना हटवण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तीबद्दल विरोधकांना विश्वास आहे. विरोधकांनी दावा केला आहे की त्यांना सत्ताधारी पक्षाच्या 28 खासदारांचा आणि सरकारच्या मित्रपक्षांच्या इतर सदस्यांचा पाठिंबा आहे, असं वृत्त 'जिओ टीव्ही'ने सूत्रांचा हवाला देत दिलं आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया