पाकिस्तान दीर्घ काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती इथपर्यंत पोहोचली आहे की पाकिस्तानला आता परदेशात आपली मालमत्ता विकावी लागत आहे. पाकिस्तान अमेरिकेतील आपल्या दूतावासाची इमारतही विकण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी अलीकडेच अमेरिकेतील त्यांच्या दूतावासाची इमारत विकण्यास मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी बोली प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या इमारतीसाठी आतापर्यंत तीन बोली मिळाल्या आहेत. एका ज्यू समूहाने सर्वाधिक बोली लावली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च बोली भारतीय रिअल्टरकडून लावण्यात आली आहे. ही इमारत अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनच्या पॉश भागात आहे आणि तिची किंमत सुमारे ६० लाख डॉलर्स असल्याचे म्हटले जात आहे.
सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात पाकिस्तानला या मालमत्तेसाठी तीन बोली मिळाल्या आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने राजनयिक सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की ज्यू समूहाने या इमारतीसाठी सर्वाधिक बोली लावली आहे. या इमारतीत ज्ध्एकेकाळी पाकिस्तानच्या दूतावासाचा संरक्षण विभाग होता. पाकिस्तानी राजनैतिक सूत्रांनी सांगितले की, सुमारे ६.८ मिलियन डॉलर्सची सर्वाधिक बोली एका ज्यू समूहाने लावली होती. समूहाला इमारतीत एक प्रार्थना स्थळ उभारायचे आहे.
भारतीयानेही लावली बोलीसूत्रांनुसार, एका भारतीय रिअल इस्टेट एजंटने सुमारे ५ मिलियन डॉलर्सची दुसऱ्या क्रमांकाची बोली देखील लावली. तर एका पाकिस्तानी रिअल इस्टेट एजंटने 4 मिलियन डॉलर्सची तिसऱ्या क्रमांकाची बोली लावली. ही इमारत सर्वाधिक बोली लावणाऱ्याला विकली जावी, असे मत पाकिस्तानी रिअल इस्टेट एजंटने व्यक्त केले.
रुझवेल्ट हॉटेलच्या खासगीकरणावर विचारयाआधी सोमवारी, न्यूयॉर्कमधील रुझवेल्ट हॉटेलची मालमत्ता भाड्याने दिली जाणार होती आणि खाजगीकरणासंदर्भातील कॅबिनेट समितीने (CCoP) खाजगीकरण आयोगाला आर्थिक सल्लागाराचे नाव देण्याची विनंती केली. हॉटेल पाकिस्तानच्या मालकीचे आहे आणि पाक सरकार त्याच्या संभाव्य मिश्र-वापराच्या विकासासाठी एक सहकारी उपक्रम तयार करण्याचा विचार करत आहे. अर्थमंत्री इशाक दार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.