इस्लामाबाद : इस्लामिक स्टेटविरुद्धच्या (इसिस) आंतरराष्ट्रीय आघाडीत सहभागी होण्याच्या अमेरिकेच्या आवाहनावर पाकिस्तान विचार करत आहे. आवाहनाला प्रतिसाद दिल्यास देशात प्रतिक्रिया उमटण्याची आणि न दिल्यास देश आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडण्याची भीती त्याला भेडसावत आहे. ही संघटना जगातील शांततेला अल-काईदानंतरचा सर्वात मोठा धोका ठरली असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकसह अनेक देशांना या आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते काजी खलीलुल्लाह यांनी सांगितले.
पाकची गोची
By admin | Published: September 21, 2015 11:15 PM