पेशावर : पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पेशावरच्या अतिसुरक्षा असलेल्या क्षेत्रात सोमवारी एका मशिदीत नमाजाच्या वेळी झालेल्या शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान ५० जण ठार आणि १०० जण जखमी झाले.
पुढच्या रांगेत बसलेल्या आत्मघातकी हल्लेखोराने दुपारी १.४०च्या सुमारास जुहर (दुपारची) नमाज अदा करत असताना त्याच्याकडील स्फोटकांचा स्फोट केला. नमाज पढणाऱ्यांत बहुतांश पोलिस, लष्कर आणि बॉम्बशोधक पथकाचे कर्मचारी होते. तेहरिक-ए-तालिबान या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडविल्याचा दावा केला आहे.
मशिदीतील भीषण स्फोटात आतापर्यंत ४६ जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे लेडी रीडिंग रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर पेशावर पोलिसांनी ३८ मृतांची यादी जाहीर केली आहे. पेशावरचे पोलिस अधीक्षक (तपास) शहजाद कौकब यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आपण नमाज अदा करण्यासाठी नुकताच मशिदीत प्रवेश केला असता हा स्फोट झाला, पण सुदैवाने आपण बचावलो.
ढिगाऱ्यात अनेक जण दबलेया भीषण स्फोटात मशिदीचा काही भाग कोसळला असून अनेक लोक त्याच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे समजते. अनेक सैनिक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत आणि बचाव कर्मचारी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत, स्फोटाच्या वेळी परिसरात ३००-४०० पोलिस अधिकारी उपस्थित होते. सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
पंतप्रधानांकडून निषेध व्यक्तपंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून या घटनेमागील हल्लेखोरांचा इस्लामशी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. स्फोटात शहीद झालेल्यांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही, या लढाईत संपूर्ण देश एकजूट आहे, असे ते म्हणाले. परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
रुग्णालयांमध्ये आणीबाणीnपेशावरच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित. रुग्णालय प्रशासनाचे लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन. nस्फोटानंतर इस्लामाबादसह प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक.nइस्लामाबादकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून महत्त्वाच्या ठिकाणी आणि इमारतींवर स्नायपर तैनात.