इस्लामाबाद: दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतीय हद्दीत दहशतवादी घुसवण्यासाठी नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाकिस्तानचे ११ सैनिक मारले गेले. भारताच्या प्रतिहल्ल्यानं पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तान सरकारकडून हे नुकसान लपवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांमुळे पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लिपा आणि नीलम खोऱ्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची कबुली पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांनी दिली आहे.भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरूभारताच्या जोरदार प्रत्युत्तरानं नीलम, लिपा खोऱ्यात आणि मुझफ्फराबाद जिल्ह्यातल्या नौशेरा सेक्टरमध्ये मोठं नुकसान झाल्याची कबुली पीओकेच्या नागरी संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव सय्यद शाहिद मोहयिद्दीन कादरी यांनी दिली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 'भारताकडून गेल्या वर्षीदेखील नीलम खोऱ्यात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला होता. मात्र यंदा करण्यात आलेला गोळीबार गेल्या वर्षीच्या प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे,' असं कादरी म्हणाले.Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसानइम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्यांच्या रडारवरभारताकडून झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू आणि २५ हून अधिक जण जखमी झाल्याचं नीलम खोऱ्याचे उपायुक्त राजा महमूद शाहिद यांनी सांगितलं. या हल्ल्यात किमान १५ घरं उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केला. भारतीय सैन्याच्या धडाकेबाज प्रत्युत्तरानंतर पीओकेचे कथित पंतप्रधान राजा फारूक हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. सीमावर्ती भागातील पाकिस्तानी नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? इथल्या नागरिकांना केव्हापर्यंत अशा हल्ल्यांचा सामना करावा लागणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.पाकिस्तान बिथरला; भारतीय राजदूतांना समन्सपाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. केरन, पुंछ आणि उरीमध्ये गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केले. भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या राजदूतांना पाकिस्तान सरकारनं समन्स बजावलं आहे. याशिवाय काल रात्रभर सीमावर्ती भागात बेछूट गोळीबार सुरू आहे.दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी या आठवड्यात पाकिस्तान सैन्यानं दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. याआधी ७-८ नोव्हेंबरलादेखील पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. या दरम्यान तीन दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या तिन्ही दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला.
भारताच्या प्रत्युत्तरामुळे पीओकेत आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान; पाकिस्तानची कबुली
By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 9:43 AM