ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद. दि. 27 - दिग्दर्शक कबीर खान यांच्याविरोधात कराची विमानतळावर निदर्शन करण्यात आलं. कबीर खान पाकिस्तानविरोधी चित्रपट बनवत असल्याचा आरोप करत हे निदर्शन करण्यात आलं. यावेळी निदर्शन करणा-यांपैकी एकाने कबीर खान यांना बूटदेखील दाखवला. कबीर खान यांनी 'बजरंगी भाईजान', 'फॅण्टम' आणि 'एक था टायगर' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
कबीर खान परिषदेला उपस्थित राहण्यासाठी कराचीमध्ये आले होते. कबीर खान लाहोरला जाण्यासाठी जिन्नाह आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. यावेळी काही लोकांनी त्यांना घेराव घातला आणि 'शेम शेम'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. निदर्शन करताना भारताविरोधी घोषणादेखील देण्यात आल्या. कबीर खान यांच्या 'फॅण्टम' आणि 'एक था टायगर' चित्रपटावर रिलीजदरम्यान पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. 'फॅण्टम' चित्रपटावर लाहोर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती.
WATCH: Indian director Kabir Khan heckled,threatened with a shoe at Karachi airport for making 'anti-Pakistan' filmshttps://t.co/AEtnsiaTRf— ANI (@ANI_news) April 27, 2016