काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या नागरिकांच्या हत्यांचं पाकिस्तानकडून (Pakistan) समर्थन सुरू आहे. दहशतवादी (Terrorist) सीमा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हीच परिस्थिती राहिली तर आम्ही सीमा ओलांडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) करू, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिला होता. या इशाऱ्यावर पाकिस्तान (Pakistan) भडकला आहे.
पूँछमध्ये हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. भारत सुरक्षेबद्दल जराही तडजोड करणार नाही असा संदेश त्यावेळी आपण जगाला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्त्वाखाली सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. भारताच्या सीमांशी छेडछाड करणं सोपं नाही आणि आम्ही आमच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत हा संदेश सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच जगाला अतिशय स्पष्टपणे दिला, असं शाह म्हणाले.
अमित शहांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. अमित शाह भडक विधान करत आहेत. त्यांनी हे विधान भ्रामक असल्याचे म्हणत निषेध व्यक्त करत असल्याचे म्हटले आहे. भारताच्या गृहमंत्र्यांचे हे विधान भाजपा-आरएसएसची प्रवृत्ती दाखवितो. त्यांचा उद्देश क्षेत्रीय तनाव उत्पन्न करणे हा आहे. पाकिस्तानशी वैर पत्करणारे ही विचारधारा त्याना राजकीय दृट्या फायदा पोहोचविते असा आरोप केला आहे.
अशा प्रकारची वक्तव्ये ही भारतात पसरत असलेला दहशतवाद आणि जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन आदीवरून आंतरराष्ट्रीय संस्थांचे लक्ष भटकविण्याचे काम करतात. पाकिस्तानने नेहमी आंतरराष्ट्रीय संघटनांचे लक्ष भारताच्या या खतरनाक प्लॅनवर वळविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.