इस्लाबामाद- बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. गेल्या महिन्यात पाकच्या दोन एफ-16 या लढाऊ विमानांनी नवी दिल्लीहून काबूलला जाणाऱ्या एक भारतीय प्रवासी विमानाला आकाशात घेरलं होतं. जवळपास पाकच्या एफ16 विमानांनी भारताच्या प्रवासी विमानाचा तासभर पाठलाग केला होता.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी स्पाइसजेटच्या विमानाला हवेत रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाकच्या एफ-16मधील वैमानिकांनी भारतीय विमानाच्या वैमानिकाला विमानाची उंची कमी करून माहिती देण्यास सांगितलं होतं. स्पाइसजेटच्या कॅप्टननं एफ 16 वैमानिकांना सांगितले की, हे स्पाइसजेट आहे; जे भारताचं व्यावसायिक विमान आहे. यात प्रवासी असून, ठरलेल्या वेळेत काबूलला जात आहे. ..अन् त्यावेळी विमानातील 120 प्रवासी घाबरलेपाकिस्तानच्या एफ 16 विमानानं जेव्हा भारताच्या प्रवासी विमानाला घेरलं, तेव्हा त्यात 120 प्रवासी होते. विशेष म्हणजे ही घटना तेव्हा घडली जेव्हा भारताच्या प्रवेशासाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद नव्हती. ही घटना गेल्या 23 सप्टेंबरला झाली आहे. स्पाइसजेटचं विमान एसजी—21 दिल्लीहून अफगाणिस्तानच्या काबूलला जात होते. पाकिस्तानच्या एफ 16 विमानानं भारताच्या स्पाइस जेट विमानाला घेरलं होतं, ते त्या विमानाभोवतीच घिरट्या घालत होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांनीही ती विमानं पाहिली.
भारताच्या प्रवासी विमानाला पाकच्या F-16नं तासभर घेरलं; ना’पाक’ कुरापती सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 6:19 PM