Russia-Pakistan: असा एकही मित्र नाही, ज्याला पाकिस्ताननं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:00 PM2023-01-20T23:00:37+5:302023-01-20T23:02:25+5:30

Pakistan-Russia Oil Deal: यात पुतिन यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्यात रशिया उत्सुक असल्याचा पुनरुच्चारही केला आहे.

Pakistan backstabbed russia giving arms to ukraine but Putin took a big decision about oil deal | Russia-Pakistan: असा एकही मित्र नाही, ज्याला पाकिस्ताननं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय!

Russia-Pakistan: असा एकही मित्र नाही, ज्याला पाकिस्ताननं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय!

Next


एकीकडे पाकिस्तान युक्रेनला शस्त्र पुरवठा करून रशियाची फसवणूक करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने मार्च महिन्यापासून रशियाकडून स्वस्त तेल आयात करणार असल्याची घोषणा केली आहे. शाहबाज सरकार एकूण आवश्यकतेच्या 35 टक्के तेल रशियाकडून खरेदी करणार आहे. एवढेच नाही, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचाही संदेश मिळाला आहे.

यात पुतिन यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्यात रशिया उत्सुक असल्याचा पुनरुच्चारही केला आहे. याच बरोब, आपण मुस्लीम जगत आणि दक्षिण आशियात पाकिस्तानला एक महत्वाचा भागिदार म्हणून पाहतो, असेही पुतिन यांनी म्हटले आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, पुतिन यांचा हा संदेश रशियाचे ऊर्जा मंत्री निकोले शुल्गिनोव्ह यांनी पोहोचवला आहे. त्यांनी शहबाज शरीफ यांची लाहोर येथे भेट घेतली. खरे तर आज रशिया आणि  पाकिस्तान यांच्यातील आंतर-सरकारी आयोगाच्या बैठकीची ही 8वी फेरी आहे.

शुल्गिनोव्ह हे रशियन डेलिगेशनचे अध्यक्ष आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, दोन्ही देशांनी किफायतशीर दरात पेट्रोलियम पदार्थ खरेदी करण्यावर चर्चा केली. याच बरोब, पाकिस्तानला रशियाकडून गॅस आणि तेलाच्या पुरवठ्याशिवाय, गॅस पाईपलाइन प्रोजेक्टवरही समीक्षा करण्यात आली. महत्वाचे म्हणजे रशियाने ही घोषणा अशावेळी केली आहे, जेव्हा पाकिस्तान युक्रेनला शस्त्र पुरवठा करत आहे. पाकिस्तानच्या दारूगोळ्याचा वापर करत युक्रेन सैनिक रशियन सैनिकांवर हल्ले करत आहे. 

Web Title: Pakistan backstabbed russia giving arms to ukraine but Putin took a big decision about oil deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.