इस्लामाबाद - मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांची धरपकड केल्यानंतर आता पाकिस्तान सरकारने हाफिझ सईदच्या दहशतवादी संघटनांवरही कारवाई केली आहे. हाफिझ सईदची दहशतवादी संघटना जमात उल दावा आणि या संघटनेची सहसंस्था असलेल्या फालाह ए इंसानियत फाऊंडेशन या संस्थांवर पाकिस्तान सरकारने दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून चालणाऱ्या दहशतवादी संघटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच भारताने कुटनीतिक दबाव आणून जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यामुळे अखेर आंतरराष्ट्रीय दबावासमोर झुकून पाकिस्तानला आपल्या देशातील दहशतवादी संघटनांवर करावाई करावी लागत आहे. त्याचाच भाग म्हणून आज . हाफिझ सईदची दहशतवादी संघटना जमात उल दावा आणि या संघटनेची सहसंस्था असलेल्या फालाह ए इंसानियत फाऊंडेशन या संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे.
हाफिझ सईदच्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 22:20 IST