अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. देशातील महिलांच्या कपड्यांबाबत अनेक निर्बंध लागू केले. तर आता पाकिस्ताननंहीतालिबानच्या पावलावर पाऊल ठेवत देशातील महिला शिक्षकांच्या कपड्यांबाबत नवी नियमावली जाहीर केलीय. पाकिस्तानमध्ये आता शिक्षक ड्यूटीवर असताना जीन्स, तंग कपडे, टी-शर्ट आणि चप्पल घालू शकत नाहीत, असा नवा नियम जारी केला आहे. पाकिस्तानच्या संघीय शिक्षण निर्देशालयानं याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची ही नवी नियमावली पाहता ढवळ्याशेजारी बांधला पोवला, वाण नाही पण गुण लागला अशी अवस्था झालीय.
अफगाणिस्ताननं शेजारील देशांसाठी धोका बनू नये; पुतीन यांचा तालिबानला थेट इशारा!
पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राच्या माहितीनुसार पाकिस्तानातील महिला शिक्षकांना जीन्स आणि घट्ट कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. तर पुरूष शिक्षकांनाही जीन्स आणि टीशर्ट परिधान करता येणार नाहीय. देशातील शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रायार्यांना याबाबतचं पत्र पाठवण्यात आलं आहे. यात शाळा आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यपकांना आपल्या शिक्षण संस्थेतील शिक्षक ड्रेसकोड प्रोटोकॉलचं पालन करतील याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ड्रेस कोडसोबतच केस कापलेले असणं, क्लीन शेव, नखं कापलेली असणं इत्यादी सूचनांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये व ड्युटीवर असताना या नियमांचं शिक्षकांना पालन करावं लागणार आहे.
तालिबाननं वचन मोडलं! काबुलमध्ये नॉर्वेच्या दूतावासावर कब्जा, विद्यार्थ्यांची पुस्तकं फाडली
महिला शिक्षकांसाठी नियम काय?पाकिस्तानातील नव्या नियमानुसार देशातील सर्व महिला शिक्षकांना टिचिंग गाऊन आणि लॅबमध्ये कोट परिधान करावा लागणार आहे. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयाच्या वॉचमन, सहाय्यक कर्मचारी यांच्यासाठीही ड्रेस कोड सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या नोटिफिकेशननुसार महिला शिक्षकांना जीन्स आणि तंग कपडे परिधान करण्यास सक्त मनाई आहे. महिला शिक्षकांना ड्रेस, सलवार, दुपट्टा, शाल आणि हिजाब परिधान करण्यास परवानगी आहे.