युक्रेन आणि रशिया यांच्यात संघर्ष सुरू आहे. यातच पाकिस्तान मंगळवारी रशियाला पाठिंबा देणारा पहिला मोठा देश ठरला आहे. कारण, युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाकिस्ताने रशियासोबत पहिल्या नवीन व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या गुरुवारी सांगितले की, पाकिस्तान हा रशियाकडून जवळपास 20 लाख टन गहू आणि नैसर्गिक वायू आयात करेल. त्याच दिवशी रशियाने शेजारील युक्रेनवर लष्करी आक्रमण सुरू केले.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, रशियाला आंतरराष्ट्रीय अलगावचा सामना करावा लागत आहे. त्यांची अर्थव्यवस्था कोलमडण्यासाठी निर्बंधांचा सामना करावा लागत असतानाही इम्रान खान यांनी क्रेमलिनच्या तिजोरीतील संभाव्य अब्जावधींचा बचाव केला आहे. तसेच, पाकिस्तानच्या आर्थिक हितसंबंधांसाठी याची गरज आहे, असे सांगितले जात आहे.
रशियातील दोन दिवसांच्या दौऱ्याबाबत इम्रान खान म्हणाले, "आम्ही रशियाला गेलो कारण आम्हाला तेथून 20 टन गहू आयात करायचा आहे. पाकिस्तानचे स्वतःचे गॅसचे साठे कमी होत असल्याने नैसर्गिक वायू आयात करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी करार केला आहे". याशिवाय, 'इंशाअल्लाह काळच सांगेल की आम्ही खूप चर्चा केली आहे', असे इम्रान खान यांनी सांगितले.
दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी रशियातून बाहेर पडणाऱ्या विदेशी कंपन्यांना रोखण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे, बीपी आणि शेल यांनी युक्रेनियन हल्ल्यानंतर 20 अब्ज डॉलर किमतीचा संयुक्त उपक्रम विकण्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे, रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन यांनी जाहीर केले की, राष्ट्राध्यक्षांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे, कारण पाश्चात्य देशांनी निर्बंध वाढवल्यामुळे रुबल आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे आणि बँकांवरील संकटाच्या वेळी रशियन लोक ATM मधून पैसे काढतात. ते रात्रंदिवस रांगेत उभे असलेले दिसतात.