ऑनलाइन लोकमतकराची, दि. 11 - पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात क्वेटा येथे एका हॉस्पिटलजवळ पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 14 जण जखमी झाले आहेत. क्वेटातील जारघाव रोडवर हा अज्ञात दहशतवाद्यांना बॉम्बस्फोट घडवून आणला आले.न्यायमूर्ती जहूर शाहवानी हे वाहनातून जात असताना रस्त्यावर बॉम्बस्फोट झाला आहे न्यायमूर्तींसोबत दहशतवादविरोधी दलाचे वाहन होते. यादरम्यान हा स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. हा बॉम्ब रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आला होता. बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी सांगितले की, न्यायाधीश या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पण त्यांच्या सुरक्षेतील वाहनाला या स्फोटाची झळ बसली. दरम्यान जखमींमधील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या घरातील खिडक्यांच्या काचा तुटल्या. पोलिसांनी या परिसराला घेरले असून तपास सुरू आहे .
पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरला, स्फोटात 14 जण जखमी
By admin | Published: August 11, 2016 9:07 PM