कराची : ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाला चौफेर टीकेला सामोरे जावे लागत असून, पाकिस्तानी मीडियाही संघाच्या कामगिरीवर चांगलेच भडकले आहे. त्यांनी कर्णधार आणि प्रशिक्षकांना या पराभवाबद्दल जबाबदार धरले आहे.पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात चार तेज गोलंदाज खेळवण्याची रणनीती चुकीची होती, असे सर्व माध्यमांनी ठासून सांगितले आहे. ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने म्हटले आहे, की खेळपट्टी ओलसर असताना असा निर्णय होतोच कसा? डावखुरा फिरकी गोलंदाज इमाद वासिमला बाहेर ठेवणे संघाला महागात पडले. सामन्याच्या पहिल्या षटकापासून चेंडू वळत होते. संघाच्या थिंक टँकने इमादला बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे पाहून क्रिकेट समीक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. संघव्यवस्थापनास खेळपट्टीचा अंदाज येत नसेल तर याला काहीच अर्थ उरत नाही.‘द नेशन’ या वृत्तपत्राने ‘क्रिकेटमध्ये मुलांपेक्षा मुलीच भारी’ अशा आशयाचे हेडिंग देऊन संघाच्या पराभवाची हेटाळणी केली आहे. ‘द डेली टाईम्स’ने पाकिस्तानी संघाच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाची नोंद घेत ‘दुर्दैवाचा फेरा सुरूच’ अशा आशयाचा मथळा दिला आहे. पाकिस्तानी चाहते संतप्तकराची : ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा राग अनावर झाला. अनेकांनी याबद्दल आफ्रिदीला जबाबदार धरले तर काहींनी आपला राग टीव्ही सेटवर काढला. धोनीने विजयी धाव घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करताच निराश झालेले पाकिस्तानी चाहते संघाच्या गचाळ कामिगिरीची गटागटाने चर्चा करीत होते. काही ठिकाणी चाहते इतके भडकले होते, की त्यांनी आपले टीव्ही सेट फोडून टाकले. काही ठिकाणी संघाच्या आणि पीसीबीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. फिरकी गोलंदाज इमाद वासिमला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवत माजी कसोटीपटू बासित अली यांनी याबद्दल माजी कर्णधार इम्रान खान याला जबाबदार धरले. त्याने जाणीवपूर्वक संघाला चुकीचा सल्ला दिला, असे अली यांनी म्हटले आहे. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराही या निर्णयावर भडकला. तो म्हणाला, ‘‘आफ्रिदी हा फिरकी गोलंदाज नाही. संघात एक स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज हवा होता.’’ माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक म्हणाला, ‘‘खेळपट्टी ओळखण्यात आपली चूक झाली. चार तेज गोलंदाज खेळवावेत, अशी ही खेळपट्टी नव्हती. न्यूझीलंडने टीम साउदीसारख्या गोलंदाजाला बाहेर बसवून तीन फिरकी गोलंदाज खेळवले, यावरून आपण बोध घ्यायला हवा होता.’’ संघाची निवड चुकीची होती, असे मत रमीझ राजा यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘सामन्याच्या आधी एक दिवस चार तेज गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेणे चुकीचे आहे.’’
पाक मीडियाचा कर्णधार, कोचवर हल्लाबोल
By admin | Published: March 21, 2016 2:23 AM