पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला. पीठ, तेल, डाळींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, पाकिस्तानला आयएमएफनेही कर्ज देण्यास नकार दिला असून आता देश आणखी अडचणीत सापडलाय. दरम्यान, मित्र देश असलेला चीन या संकटातून पाकिस्तानला बाहेर काढणार असं बोललं जात होतं, पण आता चीननेही हात वर केले आहेत.
पाकिस्तान आणि चीनचे संबंध खूप चांगले आहेत, पण चीनने अजुनही मदत केलेली नाही.२०१५ मध्ये जेव्हा चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर लाँच करण्यात आला तेव्हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चीनप्रमाणेच मोठा फायदा होईल अशी अपेक्षा होती. पण, हा प्रकल्प पूर्ण होण्याआधीच दोन्ही देशांमध्ये अंतर आले आहे, तर सुरुवातीला हा प्रकल्प म्हणजे दोन्ही देशांमधील मैत्रीची ओळख असल्याचे वर्णन केले जात होते.
आफ्रिकेमध्ये चीनच्या सोन्याच्या खाणीवर हल्ला; 9 चिनी मजूर ठार
आता एकूण कर्जापैकी केवळ २५ टक्के कर्ज चीनवर आहे. याशिवाय पाकिस्तानची राजकीय स्थितीही चांगली नाही. तसेच, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पाकिस्तान आणि चीनमधील संबंध ताणले आहेत, त्यामुळे चीन मदतीसाठी पुढे येत नसल्याचे बोलले जात आहे.
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सक्रिय झाले असून त्यांनी दहशतवादी हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. सीपीईसीच्या कामात गुंतलेल्या चिनी नागरिकांवर टीटीपीने हल्ला केला. यासोबतच स्थानिक लोकांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले, ज्याचा परिणाम सीपीईसी प्रकल्पावर झाला.
चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि बंदर विकसित केले जाणार होते, पण आज पाकिस्तानमध्ये अनेक प्रकल्प रखडले आहेत. एवढेच नाही तर सीपीईसीचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
चीन पाकिस्तानला सुमारे १५ अब्ज डॉलर्स देण्याच्या विचारात आहे, पण सध्या अजुनही जाहीर केलेले नाही.