इस्लामाबाद : जगातील इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानातही कोरोना थैमान घालत आहे. यातच आता येथील एका मौलवीचे एक वक्तव्य सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे लोकही मौलवींच्या या वक्तव्याची जबरदस्त खिल्ली उडवत आहेत. या व्हिडिओ क्लीपमध्ये एक मौलवी, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी भरपूर झोपा, असा सल्ला देताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये मोलवी म्हणतात, "स्वतः आपले डॉक्टरच आपल्याला सांगत आहेत, की तुम्ही अधिक झोपा. जेवढ्या वेळ तुम्ही झोपाल, तेवढ्या वेळ तुमचा व्हायरसही झोपलेला असेल आणि तो तुमचे काहीच नुकसान करणार नाही. त्यामुळे झोपल्यावर तो झोपतो, तर मेल्यानंतर तो मरतोसुद्धा."
CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार
हा व्हिडिओ पत्रकार नाइला इनायत यांनी आपल्या ट्विटरवर टाकला आहे.
96 तास, 38 बैठका अन् पाच राज्यांवर 'फोकस', कोरोनावर वार करण्यासाठी मोदी-शाहंचा टॉप गिअर
ते हे सायन्स यापूर्वी का नाही सांगू शकले, असे एका इंडियन मुलगी नावाच्या ट्विटर युझरने विचारला आहे.
"सर, कोणती मेडिकल अथवा सायंटिफिक कन्सेप्ट याची व्याख्या करू शकते," असा प्रश्न डॉ. सरकार नामक एका ट्विटर युझरने केला आहे.
पाकिस्तानातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,35,700च्याही पुढे गेला आहे. यापैकी 51,518 रुग्ण सिंध प्रांत, 50,087 पंजाब प्रांतात, 17,450 खैबर-पख्तुनख्वा भागात, 7,866 बलुचुस्तानात, 7,163 इस्लामाबादमध्ये, 1,044 गिलगीट बाल्टिस्तानमध्ये तर 574 पीओकेमध्ये आहेत.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही
पाकिस्तानच्या आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात कोरोनाची सुविधा असलेल्या रुग्णालयांची संख्या 820 एवढी आहे. तर जवळपास 9,000 कोरोनाबाधित रुग्णालयात भरती आहेत. तसेच इतर रुग्ण त्यांच्या घरीच सेल्फ आयसोलेशनमध्ये बरे होत आहेत.