इस्लामाबादः पाकिस्तान अनेकदा चीनला सर्वात विश्वासार्ह मित्र मानत आला आहे, पण विशेष म्हणजे चीननं भागीदारीच्या नावाखाली पाकिस्तानचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. चिनी कंपन्या पाकिस्तानमध्ये 62 अब्ज डॉलर्सचा खर्च केल्यानंतर चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) अंतर्गत मोठ्या प्रमाणात नफा कमाविण्यात गुंतल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विजेच्या वाढत्या दराची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. त्या समितीनं आपल्या अहवालातून चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर (सीपीईसी) अंतर्गत चीनी कंपन्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. सीपीईसीमध्ये असलेला पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार यामुळे पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे.पाकिस्तानच्या 'पॉवर सेक्टर ऑडिट कमिटी, सर्क्युलर डेबट रिझर्वेशन अँड फ्यूचर रोडमॅप'ने 278 पानांचा अहवाल तयार केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, वीजनिर्मिती क्षेत्रात अनियमिततेमुळे 100 अब्ज रुपयांचे पाकिस्तानला नुकसान झाले आहे. यापैकी एक तृतीयांश तोटा चिनी प्रकल्पांतून झाला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, समितीने आपल्या अहवालात खुलासा केला आहे की, सीपीईसी अंतर्गत हुनेंग शांडोंग रुई एनर्जी (एचएसआर) आणि कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनी लिमिटेडनं कोळसा प्रकल्पांसाठीचा खर्च फुगवून सांगितला आहे.समितीच्या अहवालानुसार, चीनमधील कोळशावर आधारित दोन प्रकल्पांसाठी सुमारे 32.46 अब्ज रुपये (पाकिस्तानी रुपये)च्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. या कंपन्यांना 48 महिन्यांसाठी व्याजदरात सूट देण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात या प्रकल्पाचे संपूर्ण काम केवळ 27-29 महिन्यांतच पूर्ण झाले. त्यामुळे कंपन्यांना जास्तीचा मोबदला मिळत राहिला. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचं 6% वार्षिक अवमूल्यन झाल्यामुळे हा नफा आणखी वाढला. चीनी कंपनी एचएसआरने बांधकामादरम्यान दीर्घ मुदतीसाठी कर्ज घेतले. पहिल्या वर्षात आणि दुसर्या वर्षी कोणतेही पैसे उसने घेतले नाहीत. कमी व्याजदरासह अल्प मुदतीच्या कर्जासह हे त्याचे कार्य करीत होते. समितीने ज्या दोन प्रकल्पांचा तपास केला आहे, त्या प्रारंभाच्या वेळी त्यांची किंमत 3.8 अब्ज होती. समितीला असे दिसून आले की, कंपन्यांना अतिरिक्त 483 अब्ज रुपये दिले गेले आहेत, जे सध्याच्या विनिमय दरावर ३ अब्ज डॉलर्सच्या समतूल्य आहेत. पाकिस्तान सरकारने चीनला मिळालेले जादा पैसे परत करण्यासाठी चिनी कंपन्यांवर दबाव आणावा, असंही समितीने अहवालात सुचविले आहे. सीपीईसीमध्ये पाकिस्तानच्या लष्कराची थेट भूमिका पाहता ही समिती चिनी प्रकल्पांच्या तपासणीतही काहीशी मवाळ आहे. सीपीईसी प्राधिकरणाचे अध्यक्ष सध्या लेफ्टनंट जनरल असीम सलीम बाजवा असून, माहिती व प्रसारण मंत्री आहेत. मीडियाच्या वृत्तानुसार, 16 चिनी वीज उत्पादक कंपन्यांनी 60 अब्ज रुपयांची गुंतवणूक केली आणि गेल्या दोन-तीन वर्षात केवळ 400 अब्ज नफा मिळवला. पाकिस्तानची अर्थव्यवस्था यापूर्वीच बुडण्याच्या मार्गावर आहे आणि कोरोना विषाणूची साथीची परिस्थिती देखील बिकट झाली आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याऐवजी पाकिस्तान सरकार साथीच्या आजाराच्या नावाखाली नेहमीप्रमाणे पुन्हा कर्जाची मागणी करीत आहे. आता चीनची गुंतवणूकही पाकिस्तानच्या कर्जाच्या विळख्यात सापडली आहे. चिनी गुंतवणुकीबद्दल उपस्थित केलेल्या सर्व शंका आतापासून खऱ्या सिद्ध होत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा
...म्हणून चीन अफवा पसरवतो, डोनाल्ड ट्रम्प यांनी साधला निशाणा
एका कुटुंबाला कचऱ्यात सापडल्या दोन बॅगा अन् उघडून पाहतात तर काय...
CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका
CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'
Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत
CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा
CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत