पॅरिस - भारताविरोधातदहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानाला आज जबरदस्त धक्का बसला आहे. फायनँशियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानचा ग्ले लिस्टमधील समावेश कायम ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. FATF च्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांचा मिळणारी आर्थिक रसद तोडल्याचे पुरावे FATF ला दिले होते. मात्र या पुराव्यांबाबत या संस्थेला संशय आहे. मात्र मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड असलेल्या हाफिझ सईद याला देण्यात आलेली ११ वर्षांची शिक्षा हीच पाकिस्तानसाठी एकमेव आशेचा किरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा यापुढेही FATFच्या ग्रे लिस्टमधील समावेश कायम राहणार आहे. ही बाब पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानली जात आहे. कारण जर पाकिस्तानने दिलेल्या पुराव्यांमधून FATF चे समाधान झाले नाही तर पाकिस्तानचा समावेश ब्लॅकलिस्टमध्ये केला जाऊ शकतो. दरम्यान, पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यासाठी तुर्की आणि मलेशियाने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले.
भयंकर संकटामुळे पाकिस्तानात आणीबाणी लागू; भारताकडे मागितला मदतीचा हात
हनी ट्रॅप: नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला गोपनिय दस्तावेज पुरविले; 11 अटकेत
पाकिस्तानला धक्का; निजामाचे 325 कोटी भारताच्या तिजोरीत जमा दरम्यान, पारिस्तानी प्रसारमाध्यमे एका अमेरिकी थिंक टँकच्या एका अहवालावर विश्वास ठेवून आहेत. ज्यामध्ये दक्षिण आशियाविषयक तज्ज्ञ मायकेल कुगलमन यांनी पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याच येणार नाही. मात्र त्याचा काळ्या यादीत समावेश केला जाणार नाही, असे म्हटले आहे. दरम्यान, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या FATF च्या प्लेनरी मीटिंगमध्ये पाकिस्तानच्या उत्तरावर चर्चा केली जाणार आहे. पाकिस्तानला एवढ्या लवकर ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यात येणार नाही. कदाचित वर्षाअखेरीच होणाऱ्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी इम्रान खान सरकारला दहशतवादाविरोधात विश्वसनीय कारवाई करावी लागेल, असे कुगलमन यांनी सांगितले.