जर भारतीय वंशाच्या निक्की हेली यांच्याकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा गेली तर पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे निक्की हेली यांनी केलेली घोषणा. निक्की हेली यांनी एक ट्वीट केले आहे. जर आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर पाकिस्तान, इराक आणि झिम्बाब्वे सारख्या देशांना शेकडो दशलक्ष डॉलर्स निधी देण्यात येणार नाही. मजबूत अमेरिका जगासाठी एटीएम होणार नाही, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
'अमेरिका जगासाठी एटीएम बनू शकत नाही. अध्यक्ष म्हणून मी परराष्ट्र धोरण मजबूत करण्याचा निर्णय घेईन. आम्ही आपल्या स्वत:च्या शत्रूंना पैसे हस्तांतरित न करण्याच्या प्लॅन आखू, असे निक्की हेली यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलेय. यापूर्वी त्यांनी न्यूयॉर्क पोस्टसाठी लिहिलेल्या एका लेखात म्हटले होते की, 'ज्या देशांनी आमचा द्वेष केला आहे अशा देशांना मी मदतीचा प्रत्येक रक्कम कापली जाईल. एक मजबूत अमेरिका वाईट लोकांना पैसे देऊ शकत नाही. अशा लोकांवर अमेरिकेने कमाई केलेले पैसे वाया जाऊ शकत नाहीत. आमच्यासाठी ते नेते चांगले आहेत, जे शत्रूंच्या विरोधा आणि आमच्या मित्रांसह आमच्यासोबत उभे आहेत.’
करदात्यांना जाणून घेण्याचा अधिकारसाऊथ कॅरोलिना प्रांताच्या गव्हर्नर राहिलेल्या निक्की हेली म्हणाल्या की, गेल्या वर्षी अमेरिकेने ४६ अब्ज डॉलर्स परदेशी मदत खर्च केली. ही रक्कम इराक आणि पाकिस्तानसारख्या देशांना देण्यात आली. अमेरिकन करदात्यांना त्यांचे कष्टाचे पैसे कुठे चालले आहेत आणि कशावर खर्च केले जात आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. “बायडेन प्रशासनाने सांगितले की पाकिस्तानला पुन्हा मदत करण्यास सुरवात केली आहे. परंतु दहशतवादी संघटना अजूनही तेथे सक्रिय आहेत,” असेही त्या म्हणाल्या.
जेव्हा मी संयुक्त राष्ट्रात अमेरिकेची राजदूत होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले गेले, ज्यायोगे पाकिस्तानला २ अब्ज डॉलर्सची मदत थांबविली गेली. हा निर्णय घेण्यात आला कारण अमेरिकन सैनिकांना ठार. केलेल्या दहशतवादी संघटनांचे ते आश्रयस्थान होते, असेही त्यांनी नमूद केले.