इस्लामाबाद:पाकिस्तानातीलइम्रान खान सरकार संकटात सापडली आहे. संसद भंग करुन इम्रान खान यांनी विरोधकांसमोर मोठा पेच निर्माण केला, पण काल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना दणका दिला. सर्वोच्च न्यायालयाने उपसभापतींचा निर्णय घटनाबाह्य ठरवत अविश्वास ठराव फेटाळणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.
आज रात्री 10 वाजता इम्रान खानचे देशाला संबोधनन्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर इम्रान यांच्या समोरच मोठी अडचण निर्माण झाली आहे. यानंतर आता इम्रान यांच्या राजकीय समितीने सामूहिक राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्रान खान म्हणाले की, 'आम्ही पाकिस्तानच्या जनतेसोबत आहोत. आमच्या कार्यकाळात जगामध्ये देशाची प्रतिमा सुधारली, जनतेच्या भल्यासाठी आम्ही राजकारण केले.' आज रात्री 10 वाजता इम्रान खान देशाला संबोधित करणार आहेत.
सर्वांचे सामूहिक राजीनामे येणारदुसरीकडे, अविश्वास प्रस्ताव टाळण्यासाठी इम्रान खान आज संध्याकाळी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ शकतात, असा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर इम्रानसह त्यांच्या पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार (राष्ट्रीय आणि प्रांतिक असेंब्लीसह) म्हणजे संपूर्ण पक्ष राजीनामा देतील. यासोबतच पीटीआयच्या तिकिटावर निवडणूक जिंकलेले आणि दुसऱ्या पक्षात गेलेल्या आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल.
इम्रान खान सरकार कोसळणारतसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या (शनिवारी) होणाऱ्या अविश्वास ठरावावरील मतदान होणार नसल्याने त्यापूर्वीच सरकार पडणार आहे. खरे तर अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले तर नंबर गेममध्ये विरोधक पुढे असल्याने इम्रान सत्तेतून बाहेर पडतील. पण जर इम्रानने आज संपूर्ण पक्षासह राजीनामा दिला तर उद्या नॅशनल असेंब्लीच्या बैठकीला काही अर्थ उरणार नाही.