ढासळत्या आर्थिक स्थितीदरम्यानच पाकिस्तानात विजेचे संकट अधिक गडद झाले आहे. राजधानी इस्लामाबादबरोबरच लाहोर आणि कराचीमध्येही तासन्तास वीज खंडित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकट निर्माण झाले होते. सरकारने जनतेला सत्ता वाचवण्याची विनंतीही केली होती. येथे मॉल्स, मुख्य बाजारपेठ सर्व वेळेपूर्वी बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. सोमवारीही अनेक जण लाईटची वाट पाहत होते. परंतु बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही लाईट न आल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. सोशल मीडियावरही लोकांचा रोष व्यक्त केल्याचे दिसून येत होते.
पाकिस्तान सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे की प्राथमिक अहवालानुसार, आज सकाळी ७:३४ वाजता नॅशनल ग्रीडची सिस्टम फ्रिक्वेन्सी कमी झाली, ज्यामुळे वीज यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बिघाड झाला. मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा आणि गुड्डू दरम्यानच्या हाय-टेंशन ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे देशाच्या विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. पाकिस्तानला आधीच वीज टंचाई आणि मोठ्या प्रमाणात वीच कपातीचा सामना करावा लागत आहे.
सोशल मीडियावर रोषसोशल मीडियावरही लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. यूजर्सच्या म्हणण्यानुसार अनेक तासांपासून वीज पुरवठा खंडित झालाय. गुड्डू, जामशोरो, मुझफ्फरगड, हवेली शाह बहादूर, बलोकी येथील पॉवर प्लांटमध्ये वीज बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडिच झाल्याचे सूत्रांनी सांगितले. लाहोरमध्ये, मॉल रोड, कॅनाल रोल्ड आणि इतर भागातील ग्राहकांना वीज पुरवठ्यात व्यत्यय येत आहे, तर ऑरेंज लाइन मेट्रो ट्रेन सेवा देखील थांबली आहे.
पाकिस्तान न्यूज वेबसाइटनुसार, इस्लामाबाद विद्युत पुरवठा कंपनीच्या ११७ ग्रीड स्टेशनचा वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे, ज्यामुळे राजधानी शहर आणि रावळपिंडीच्या विविध भागांवर परिणाम झाला आहे. कराचीतील गुलिस्तान-ए-जौहर, पहलवान गोठ, जौहर मोड, भिताबाद, नाझिमाबाद, गोलीमार आणि इतर भागात वीज नाही. देशभरातील वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही तास लागू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.