पाकिस्तानात मॉब लिचिंगची एक धक्कादायक घटना घडली होती. सियालकोटमध्ये शेकडोंच्या गर्दीनं एका श्रीलंकन नागरिकाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये संबंधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्दीनं त्या व्यक्तीचा मृतदेह पेटवला. सियालकोटमधील वझिराबाद मार्गावर ही घटना घडली. दरम्यान, यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खटक (Defence Minister of Pakistan Pervaiz Khattak) यांचं धक्कादायक वक्तव्य समोर आलं आहे. परवेझ खटक यांनी श्रीलंकन नागरिकाची हत्या करणाऱ्यांचा बचाव करत ती लहान मुलं असून उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचं सांगितलं. "ती लहान मुलं आहेत, ते जोशात येतात आणि उत्स्फुर्तपणे काम करून मोकळे होतात. याचा अर्थ देश विनाशाच्या मार्गावर जातोय असं नाही. प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत. इस्लाम विरोधी असल्याचं त्यानं घोषणा दिल्या. परंतु त्यांची प्रतिक्रिया उत्स्फुर्त होती," असंही ते म्हणाले.
कधी कधी मुलांच्या हातून घडून जातं; श्रीलंकन व्यक्तीच्या हत्येवर पाकच्या मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 3:23 PM